ईन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ICSI नवी दिल्ली यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास भेट
पुणे : नविन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काय उपक्रम एकत्रितपणे राबविता येतील यासाठी ईन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ICSI नवी दिल्ली यांचे अध्यक्ष सीएस मनीष गुप्ता उपाध्यक्ष बी नरसिंव्हन यांचेसह शिष्टमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट देवून कुलगुरु डॅा. सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू डॅा पराग काळकर यांचे सोबत संवाद साधला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत ICSI ने केलेल्या शैक्षणिक कराराची नविन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीकरिता शिक्षक प्रशिक्षण, जॅाईंट पदवी कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांना व्यवहारातील ज्ञानाचे नवनवीन विषय पोहोचविण्यााठी – मर्जर, ॲक्विझिशन, इनसॅाल्वंन्सी, फॅोरेन्सिक ॲाडिट, यासह ॲान द जॅाब ट्रेनिंग, ईन्टर्नशिप अधिक प्रभावी करण्यासाठी असणार्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. “विद्यार्थ्यांना महितीचे ज्ञानामधे व त्या ज्ञानाचा व्यवहारिक उपयोग करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ICSI यांनी एकत्रीतपणे काम करण्यास आपण कटिबद्ध आहोत” असे मत कुलगुरु डॅा सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. प्र – कुलगुरू डॅा पराग काळकर यांनी विद्यापीठाने मागील काळामधे ईन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ICSI यांचे सोबत शिक्षक व विद्यार्थ्यांकरिता आतापर्यंत घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या प्रसंगी सीएस अमृता नौटियाल, सीएस पवन चांडक, सीएस ऋषिकेश जोशी, सीएस विशाल पाटील व ईतर पदाधिकारी उपस्थित होते
