Wednesday, June 17, 2026
BusinessLatest NewsPUNE

यंदा साजरा होणार गोखले कन्स्ट्रक्शन्सचा ११ वा नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिव्हल


निवासी व व्यावसायिक प्रकल्पांमध्ये ९ / १८ / २७ या अभिनव सवलत योजनेचा घेता येणार लाभ

पुणे : पारदर्शक व्यवहार, उत्तम दर्जा, वेळेत ताबा यासाठी नावलौकिक असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन्स या पुण्यातील आघाडीच्या बांधकाम कंपनीने यंदाच्या नवरात्रातील आपल्या भव्य प्रॉपर्टी फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. सदर महोत्सवाचे हे ११ वे वर्ष असून पुणे शहरातील मोक्याच्या ठिकाणी प्रॉपर्टी घेवू इच्छिणारे ग्राहक कायमच या दरम्यान मिळणाऱ्या आर्थिक दृष्ट्या अत्यंत लाभदायक अशा योजनांमुळे या प्रॉपर्टी फेस्टिव्हलची आतुरतेने वाट पाहत असतात.

यंदाच्या प्रॉपर्टी फेस्टिव्हलमध्ये सादर होणाऱ्या ९ / १८ / २७ या विशेष योजने विषयी माहिती देताना गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले म्हणाले, “गेली १० वर्षे ग्राहकांनी आमच्या नवरात्रातील प्रॉपर्टी फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावर्षी १५ ते २३ ऑक्टोबर या नवरात्राच्या ९ दिवसांमध्ये  गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या कोणत्याही निवासी किंवा व्यावसायिक प्रकल्पात प्रॉपर्टी खरेदी केल्यास ग्राहकांना ९ टक्के, १८ टक्के किंवा तब्बल २७ टक्के इतकी सवलत मिळवण्याची संधी असेल.”

“शहरातील डेक्कन जीमखाना, प्रभात रस्ता, कर्वेनगर, कोथरूड येथील करिष्मा चौक व सिटी प्राईड समोरील गोखले बिझनेस बे, एरंडवणे, सहकार नगर यासारख्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी साकारात असलेल्या निवासी व व्यावसायिक प्रकल्पांमधून ग्राहकांना आपल्या आवडीची प्रॉपर्टी निवडता येईल. तसेच नवरात्राच्या काळात ९ नवीन गृह प्रकल्प सादर करणे व पूर्ण झालेल्या ९ प्रकल्पांचा ताबा देणे ही गोखले कन्स्ट्रक्शन्सची परंपरा यंदाही कायम राखली जाईल”, असे विशाल गोखले यांनी नमूद केले.

सध्या गोखले कन्स्ट्रक्शन्सतर्फे सुमारे २० लाख चौरस फूट निवासी व १५ लाख फूट व्यावसायिक जागांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. ज्यामध्ये शहरातील विविध भागात साकारणाऱ्या ३६ प्रकल्पांचा समावेश आहे. यातील ५ व्यापारी संकुले असून उर्वरित प्रकल्प हे निवासी आहेत. आजवर गोखले कन्स्ट्रक्शन्सने  १७५ गृहप्रकल्प पूर्ण केले असून ५००० हून अधिक घरांची निर्मिती केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading