Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

इंडस आंतरराष्ट्रीय शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी

लोकसहभागाद्वारे वर्गणी गोळा करून शाळेला बाह्य डिफिब्रिलेटर यंत्र भेट

पुणे  : पुणे येथील इंडस आंतरराष्ट्रीय स्कूलच्या नववीतील पाच विद्यार्थ्यांनी लोकसहभागातून १ लाख २६ हजार २३१ रूपयांची रक्कम यशस्वीरित्या जमा करून शाळेच्या इन्फर्मरीला जीवन वाचवणारे स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटर (एईडी) यंत्र भेट देत समुहभावना आणि सामाजिक जाणिवेचे उत्तम उदाहरण प्रस्तूत केल्याची माहिती शाळेचे प्राचार्य संदिप छाबरा यांनी दिली.

शाळेचे विद्यार्थी विधान गोयल, अंजनेय राव, शुब्बन गाडिया, विहान मंत्री आणि अद्वितिया कुमार यांनी समाजमाध्यमे व प्रत्यक्ष भेटीद्वारे परिचयातील व्यक्ती, शाळेचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना या उदात्त कामासाठी वर्गणी देण्याचे आवाहन केले. त्यांनी डिफिब्रिलेटर (एईडी) यंत्राबाबत संपूर्ण माहिती मिळवली आणि या यंत्रासाठी आवश्यक रक्कम गोळा करण्याचे प्रयत्न सुरू केले.

केवळ यंत्र घेण्यासाठी रक्कम गोळा करण्यापुरते हे कार्य मर्यादीत न ठेवता त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) बाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारीही स्विकारली. मानवी आकाराच्या पुतळ्याच्या वापर करून त्यांनी सीपीआर कार्यशाळेचे आयोजन केले. त्याबाबत त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांशीदेखील चर्चा करून त्यांचे सहकार्य मिळवले. त्यांचा निश्चय आणि भावना लक्षात घेता या वर्गणी एकत्रित करण्याच्या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळाला.

अवघ्या काही आठवड्यांत त्यांनी एईडी यंत्र खरेदी करण्यासाठी पुरेसा निधी उभारला. या यंत्राद्वारे हृदयाच्या आपत्कालीन परिस्थितीत जीवन आणि मृत्यू यातील फरक याची जाणीव करू देत जीव वाचावण्याचे काम केले जाते. या यंत्राच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकवली. आरोग्य आणि मानवी जिवीताची सुरक्षा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी केलेले कार्य सामाजिक जाणिवेने समाजात उभारल्या जाणाऱ्या उपयुक्त कार्याचे उत्तम उदाहरण आहे.

मुलांनी शाळा सुरळीत चालू ठेवण्यासाठी पडद्यामागे अथक परिश्रम करणाऱ्या सहाय्यक कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. या आयोजनामागची असलेली भावना त्या कर्मचाऱ्यांना सुखावून गेली. शाळेच्या प्रत्येक घटकात समुह आणि कर्तव्यभावना वृ्द्धींगत व्हावी, त्यांच्यात स्नेह व जिव्हाळा असावा यासाठी या विद्यार्थ्यांनी राबविलेला उपक्रम मार्गदर्शक असाच आहे. त्यांना प्राचार्य संदीप छाबरा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading