अॅजीलस डायग्नोस्टिक्स लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर
निदान सेवा पुरविठादार अॅजीलस डायग्नोस्टिक्स लिमिटेड (“कंपनी”) ने त्यांचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे दाखल केला आहे.
कंपनी इक्विटी शेअर्सच्या (प्रत्येकी 10 रू. दर्शनी मूल्य) प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (“आयपीओ”) निधी उभारण्याची योजना आखत आहे. एकूण ऑफरमध्ये 14,233,964 इक्विटी शेअर्सची विक्री समभागधारकांद्वारे विक्रीसाठी ऑफर समाविष्ट आहे. (“ऑफर”)
३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रयोगशाळांच्या संख्येनुसार कंपनी सर्वात मोठी निदान सेवा पुरवठादार आहे आणि भारतातील कामकाजातून महसुलाच्या बाबतीत दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे (स्रोत: क्रिसील अहवाल)
शेअरहोल्डर्सची विक्री करून ऑफर फॉर सेल मध्ये इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन I द्वारे 2,985,075 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, NYLIM जेकब बल्लास इंडिया फंड III LLC द्वारे 7,462,700 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि रीसर्जन्स पीई इन्व्हेस्टमेंट लिमिटेड द्वारे 3,786,189 पर्यंतचे इक्विटी शेअर्स यांचा समावेश आहे. (“विक्रीची ऑफर”).
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, अॅक्सीस कॅपिटल लिमिटेड आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
कंपनी निदान चाचणी सेवा (नियमित आणि विशेष चाचण्या), स्वास्थ्य आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पॅकेजेस, रुग्णालय प्रयोगशाळा व्यवस्थापन सेवा आणि क्लिनिकल संशोधन चाचणी सेवा देते. ३१ मार्च २०२३ पर्यंत आमच्याकडे ४१३ प्रयोगशाळांचे नेटवर्क होते. त्यापैकी ४३ प्रयोगशाळांना नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (“NABL”) द्वारे मान्यता देण्यात आली होती. क्रीसील अहवालानुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत भारतातील NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळांचे हे सर्वात मोठे नेटवर्क आहे.
