या खास कारणांमुळे ” फायटर ” ची झलक आली प्रेक्षकांच्या भेटीला
बँग बँग आणि वॉरच्या फिल्मी अनिवर्सरी च्या खास निमित्ताने हृतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंद यांनी ‘फायटर’ ची खास एक झलक केली शेयर
सुपर डायरेक्टर सिद्धार्थ आनंद आणि सुपरस्टार हृतिक रोशन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या तयारीत असताना दोघांची त्यांच्या नवीन सिनेमॅटिक प्रवासाला सुरुवात करत केली आहे . सध्या ” फायटर ” ची टीम सध्या इटलीमध्ये दोन डान्स शूट करत असून याची एक खास झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली आहे. या दोघांचा मागील ब्लॉकबस्टर “बँग बँग” आणि “वॉर” या दोन्ही चित्रपटांची अनिवर्सरी सेलिब्रेट करत असताना आता हे दोघं फायटर साठी एकत्र काम करताना दिसत आहे. हे दोन्ही चित्रपट 2 ऑक्टोबर 2014 आणि 2019 रोजी रिलीज झाले होते आणि त्यांच्या चित्रपटाच्या वर्धापन दिनानिमित्त या दोघांनी फायटरच्या सेटवरील एक खास फोटो शेअर केला आहे. हृतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंद यांनीही त्यांच्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे.
अप्रतिम कथा आणि दूर दृष्टी असलेला दिग्दर्शक म्हणून सिद्धार्थ आनंद “फायटर” मधून पुन्हा एकदा बाजी मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. हृदयस्पर्शी स्टंट्स, चित्तथरारक व्हिज्युअल्स आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आकर्षक कथा असलेला “फायटर” हा एक हाय – ऑक्टेन अॅक्शन-पॅक असणार आहे यात शंका नाही. ब्लॉकबस्टर चित्रपटा नंतर सिद्धार्थ आनंद आणि हृतिक रोशन पुन्हा एकदा सिनेमॅटिक इतिहास रचण्यासाठी सज्ज होताना बघायला मिळतात.
