Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने स्वच्छता अभियान

पुणे – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त “स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा” उपक्रम पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आला. महापालिका सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे- गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळसगाव, भीमनगर,विश्रांतवाडी, नागपूरचाळ,भारतनगर,संत सयाजीनाथ माळी विसर्जन घाट तसेच गोल्फक्लब चौक उड्डाणपूल खाली एक तास स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये येरवडा परिसरातील माजी सभासद, विविध सामाजिक संस्था -संघटनांचे प्रतिनिधी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, खाजगी कंपन्यांचे कर्मचारी, येरवडा क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागातील अधिकारी व सेवकवर्ग तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने आवर्जून सहभागी झाले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली म्हणून स्वच्छता मोहीम राबवित असताना आपला परिसर ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी असे आवाहन या निमित्ताने महापालिका सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांनी यावेळी केले. या स्वच्छता मोहिमेतील सहभागी सर्व उपस्थितांना यावेळी स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तसेच स्वच्छता सप्ताह दरम्यान स्वच्छता विषयक जनजागृती व प्रबोधनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading