रमा समाधानाने घेणार आनंदी राघव च्या सुखी संसाराचा निरोप.. पण कर्णिकांच्या घरात एक नवीन व्यक्ती
आनंदीने रमाचा राहिलेला संसार आनंदाने आणि जबाबदारीने स्वीकारला.. त्यात कधी रामसोबत वाद झाला तर कधी दोघिंनी एकमेकीना साथ दिली.. पण आता रमाचा विश्वास बसला की आनंदी हा संसार आणि आपल्या राघव चिंगीला संभाळू शकते.. ह्याच समाधानाने रमाँ घेणार आहे आनंदी राघवच्या सुखी संसाराचा निरोप. पण त्याच वेळी कर्णिकांच्या आयुष्यात येणार आहे त्यांच्या खूप जवळची व्यक्ती.. त्या व्यक्तीच्या येण्याने घरात काय होणार? आनंदी राघव च्या संसारात वादळ येणार का ?? आनंदी पुन्हा एकदा परिस्थिती कशी सावरणार हे पाहण्यासाठी नक्की बघा तुमची आवडती मालिका “नवा गडी नवं राज्य” सोमवार ते शनिवार रात्री ९.०० वाजता.
