Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

समृद्धी महामार्ग : नागपूर ते नाशिक दुसरा टप्पा ‘या’ दिवशी होणार सुरू

मुंबई : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आता सुरू होणार आहे. नागपूर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होते. आता दुसऱ्या टप्प्यातील नाशिकमधील भरवीरपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले आहे. येत्या 26 मे रोजी शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यावर शिर्डी ते भरवीर अंतर 40 ते 45 मिनिटांत पार करता येणार आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी-भरवीर हा 26 मे रोजी खुला होणार आहे. त्यामुळे आता नागपूर ते नाशिक हा दुसरा टप्पा 26 मे रोजी खुला करण्यात येणार आहे.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू झाला आहे. तर, उर्वरित टप्प्याचे काम सुरू आहे. त्यापैकी शिर्डी ते भरवीर पर्यंतचे 80 किमी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिर्डी ते भरवीर पर्यंतचा 80 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading