fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNE

चंद्रकांत पाटील यांच्या बाणेरमधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पुणे : कोथरुड मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील नागरिकांच्या सेवेसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे बाणेरमध्ये नवे जनसंपर्क कार्यालय सुरू झाले असून, रविवार दि. २१ मे रोजी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हे कार्यालय सदैव कार्यरत असेल, अशी ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला स्थानिक माजी नगरसेवक अमोल बालवडकर, दिलीप वेडे पाटील, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, राहूल कोकाटे, रोहन कोकाटे, स्थानिक भाजपा कार्यकर्त्या उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर, सचिन पाषाणकर, ॲड. मिताली सावळेकर यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी उद्घाटनानंतर नामदार पाटील यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. हे कार्यालय आपल्या सेवेसाठी सदैव कार्यरत असेल, अशी ग्वाही यावेळी दिली. त्यावर उपस्थित सर्व नागरिकांनी नामदार पाटील यांचे अभिनंदन करुन, त्यांच्या कार्य कुशलतेबाबत समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: