fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsTECHNOLOGY

फास्ट्रॅक ऑटोमॅटीक्स: क्लासिक घड्याळांमध्ये फास्ट्रॅकच्या मॉडर्न टेकसह अपडेट करा तुमचा रिस्ट गेम

बंगळुरू : भारतातील आघाडीचा युवा फॅशन ब्रँड फास्ट्रॅकने आपले पहिले ऑटोमॅटिक वॉच कलेक्शन लॉन्च केले आहे. फास्ट्रॅक ऑटोमॅटीक्स हे आधुनिक लुक असलेले क्लासिक घड्याळ अशा व्यक्तींसाठी तयार करण्यात आले आहे ज्यांना त्यांचा प्रत्येक लुक अगदी परफेक्ट हवा असतो.

या कलेक्शनमधील घड्याळांची रेन्ज ऑटोमॅटिक मुव्हमेंटमधील कला आणि अचूकपणा व फास्ट्रॅकची अनोखी फॅशन स्टाईल दर्शवते.

यातील प्रत्येक घड्याळ उच्च दर्जाच्या प्रोप्रायटरी टायटन ऑटोमॅटिक मुव्हमेंटमार्फत संचालित केलेले आहे, जे सेल्फ-वाइंडिंग आहे. तुमची दिनचर्या जसजशी पुढे जाईल तसतसे हे घड्याळ पुढे जात राहील. ही घड्याळे तुम्हाला सक्रिय ठेवतात, इतकेच नव्हे तर, त्यांच्या कलरफुल प्लेटिंग तुम्हाला ट्रेन्डसेटिंग देखील बनवतात. तुमच्या आवडीच्या कोणत्याही आऊटफिटवर ही घड्याळे सर्वात मोठी स्टाईल पॉईंट्स बनतील.

फास्ट्रॅक ऑटोमॅटीक्स गाईजमध्ये तीन प्रकार आहेत – यामध्ये मल्टी-लेयर्ड स्केलेटल डायल आहे जी घड्याळांना क्लासी व अनोखा लुक देते, उच्च दर्जाचे लेदर स्ट्रॅप्स, प्रीमियम लायनिंग यांना अजून छान लुक देतात. दिवस असो वा रात्र, प्रसंग कोणताही असो ही घड्याळे खूप खुलून दिसतात.

फास्ट्रॅक ऑटोमॅटीक्स गाईज किंमत ९९९५ रुपये

फास्ट्रॅकचे मार्केटिंग हेड श्री अजय मौर्य यांनी सांगितलेफास्ट्रॅकचे नवे ऑटोमॅटिक वॉच कलेक्शन आले आहे. ही फुल स्केलेटल लुक वॉचेस स्टायलिश आणि उच्च कामगिरी बजावणारी असूनफॅशन-सॅव्ही तरुणांसाठी अगदी परफेक्ट आहेत. या बोल्ड व आधुनिक घड्याळांच्या किमती किफायतशीर असल्याने सर्वांच्या नजरा यांच्यावरच टिकून राहतील यात काहीच शंका नाही.”

मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या दोन प्रकारांमध्ये क्लासी रोज गोल्ड आणि बोल्ड ब्राऊन या दोन लोकप्रिय रंगांमध्ये स्टेनलेस स्टील केसेस व स्ट्रॅप्स बनवण्यात आले आहेत. बिझनेस कॉन्फरन्स असो किंवा बॅचलरेट पार्टी असोही घड्याळे तुमची स्टाईल खुलवतील. या वॉच फेसेसना स्केलेटल कटआऊट लुकसह डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये लेयर्ड डायल्स आहेतज्यामुळे फास्ट्रॅक ऑटोमॅटीक्सना तुम्ही प्रत्येक आऊटफिटसोबत सहजपणे मॅच करू शकता.

फास्ट्रॅक ऑटोमॅटीक्स गर्ल्स ब्राऊन प्लेटिंगमध्ये किंमत ८९९५ रुपये

ऑटोमॅटिक वॉच कलेक्शनच्या किमती ८९९५ रुपयांपासून पुढे आहेत. सर्व फास्ट्रॅक स्टोर्सटायटन वर्ल्ड स्टोर्सFastrack.in, Titan.co.in वर आणि लार्ज फॉरमॅट स्टोर्सएक्सक्लुसिव्ह अधिकृत डीलर्स आणि आमचे एक्सक्लुसिव्ह ऑनलाईन पार्टनर मिंत्रावर हे कलेक्शन विक्रीसाठी उपलब्ध आहे. लवकरात लवकर खरेदी करा!

Leave a Reply

%d bloggers like this: