Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

लायन्स् इलेव्हन, लेपर्डस् इलेव्हन, जॅग्वॉस इलेव्हन, लिंक्स् इलेव्हन उपांत्य फेरीत !!

पुणे :  व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेत लायन्स् इलेव्हन, लेपर्डस् इलेव्हन, जॅग्वॉस इलेव्हन आणि लिंक्स् इलेव्हन या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सनसिटी रोड येथील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी मैदानावर झालेल्या सामन्यात शमिका बगाटे हिने टाकलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लेपर्डस् इलेव्हन संघाने टायगर्स इलेव्हन संघाचा ४ गडी राखून पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना टायगर्स इलेव्हन संघाने ८२ धावा धावफलकावर लावल्या. अन्वित डोमकावळे ३५ आणि आनिष कुलकर्णी नाबाद १५ यांनी धावांचे योगदान दिले. शमिका बगाटे (२-१५) आणि अर्थव कुलकर्णी (२-७) यांनी अचूक गोलंदाजी करून टायगर्स संघाचा डाव मर्यादित ठेवला. हे आव्हान लेपर्डस् इलेव्हन संघाने १४.५ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. विग्नेश पेण्णेकर याने २३ धावा तर, वेदांत गावडे याने १५ धावा करून संघाचा विजय सोपा केला.

शर्विल गोसावी याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर जॅग्वॉर्स इलेव्हन संघाने टायगर्स इलेव्हन संघाचा अखेरच्या षटकामध्ये उत्कंठावर्धक पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. टायगर्स इलेव्हनने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८८ धावाच धावफलकावर लावता आल्या. निपुण भोसले (२४ धावा) आणि संकल्प काळकोटकर (२३ धावा) यांच्या धावांमुळे संघाने ८८ धावा जमविल्या. वरद तराटे (३-१७) आणि शर्विल गोसावी (२-९) यांनी अचूक गोलंदाजी केलेे. शर्विल गोसावी (२२ धावा) आणि शार्दूल शिंदे (२० धावा) यांच्या फलंदाजीमुळे जॅग्वॉर्स इलेव्हनने हे आव्हान १९.३ षटकात व ९ गडी गमावून पूर्ण केले.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
टायगर्स इलेव्हनः १८.१ षटकात १० गडी बाद ८२ धावा (अन्वित डोमकावळे ३५, आनिष कुलकर्णी नाबाद १५, शमिका बगाटे २-१५, अर्थव कुलकर्णी २-७) पराभूत वि. लेपर्डस् इलेव्हनः १४.५ षटकात ६ गडी बाद ८३ धावा (विग्नेश पेण्णेकर २३, वेदांत गावडे १५, निपुन भोसले ३-१६); सामनावीरः शमिका बगाटे;

टायगर्स इलेव्हनः २० षटकात १० गडी बाद ८८ धावा (निपुण भोसले २४, संकल्प काळकोटकर २३, वरद तराटे ३-१७, शर्विल गोसावी २-९) पराभूत वि. जॅग्वॉर्स इलेव्हनः १९.३ षटकात ९ गडी बाद ८९ धावा (शर्विल गोसावी २२, शार्दूल शिंदे २०, पुलकीत सिंग २-१३, शार्दुल नारळकर २-४); सामनावीरः शर्विल गोसावी;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading