Saturday, June 6, 2026
Latest NewsSports

कै. सुरेश बांदल स्मृती करंडक 14 व 18 वर्षाखालील जिल्हास्तरीय निमंत्रित खो खो स्पर्धेत सन्मित्र संघाची दोन गटातून आगेकूच

पुणे : रमणबाग मित्र मंडळ यांच्या वतीने व डेक्कन एज्युकेशन यांच्या सहकार्यांने व पुणे जिल्हा खो खो संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या कै. सुरेश बांदल स्मृती करंडक 14 व 18 वर्षाखालील जिल्हास्तरीय निमंत्रित खो खो स्पर्धेत सन्मित्र संघाने 18 आणि 14 वर्षांखालील गटातून आपली आगेकूच कायम राखली. 
रमणबाग प्रशालेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत सन्मित्रच्या दोन्ही कामगिरीमधील फरक म्हणजे 18वर्षांखालील गटात त्यांनी प्रतिस्पर्धी रमणबाग संघाचा डावाने दणदणीत पराभव केला, तर 14 वर्षांखालील गटातील विजयासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. नियोजित वेळेतील बरोबरीनंतर त्यांनी अलाहिदा डावात विजय मिळविला.
 
सन्मित्र संघाने आपली आगेकूच कायम राखताना 18 वर्षांखालील वयोगटात रमणबाग मित्र मंडळ संघाला १ डाव एका गुणाने पराभव केला. नरेश चांदने (2.20मिनिट), आदित्य अस्वरे (2.30मिनिट) यांच्या  बचावामुळे सन्मित्रची बाजू भक्कम झाली. त्यामुळे रमणबाग संघाला केवळ पाचच गुणांची कमाई करता आली. सन्मित्रचे आक्रमणही धारदार राहिले. अमन कदमने 4आणि किरण राठोडने 3 गडी बाद करताना सन्मित्रला 11 गुणांची कमाई करून दिली. सहा गुणांची आघाडी निर्णायक ठरली. दुसऱ्या डावातही सन्मित्रचा बचाव भक्कम राहिला. दुसऱ्या डावात कृष्णा कोपनरने (3.30मिनिटे) आणि विनय भोईटे (2.20मिनिटे) यांची बचावातील कामगिरी सुरेख ठरली. रमणबागेला दुसऱ्या डावातही 5 गुणांचीच कमाई करता आली. त्यामुळे सन्मित्रला दुसऱ्या डावासाठी मैदानात उतरावेच लागले नाही. त्यांनी डावाने विजय मिळविला. 
 
याच वयोगटात क्रीडा निकेतन संघाने अष्टपैलू खेळाच्या जोरावर एनएमएस संघाचे आव्हान एक डाव 5 गुणांनी परतवून लावले. एनएमसला आक्रमण जमलेच नाही. प्रत्येक चार या प्रमाणे त्यांना केवळ आठच गुणांची कमाई करता आली. त्या उलट क्रीडानिकेतने आक्रमणाच्या पहिल्याच प्रयत्नांत 13गुणांची कमाई करून 9 गुणांची आघाडी मिळवली. याचा पाठलाग करतानाही दुसऱ्या डावातही एनएमएसला चारच गुण मिळवता आले. क्रीडा निकेतन संघाकडून प्रसाद धनंजयने 3गडी बाद केले. तर, आकाश मोरेने (2 मिनिट आणि 2.30मिनिट, 4गडी) अशी अष्टपैलू कामगिरी केली. सगट सागर आणि अभिजित मालाकारने प्रत्येकी दोन गडी बाद केले. 
 
मुलांच्या 14 वर्षांखालील गटात समता स्पोर्टस संघाने सन्मित्रचा 1 डाव एका गुणाने पराभव केला. यशराज बनसोडे (3 गुण) आणि सार्थक पोढळे (2गुण) यांच्या धारदार आक्रमणाने समता स्पोर्टसने 9 गुणांची कमाई केली. समता संघाच्या सुयश चव्हाण (2.30मिनिटे), सार्थक घंटे (2.20 मिनिटे) यांनी केलेल्या भक्कम बचावासमोर सन्मित्रचे आक्रमण थिटे पडले. त्यांना केवळ तीनच गुणांची कमाई करता आली. त्यामुळे सन्मित्रला फॉलोऑनची नामुष्की सहन करावी लागली. अर्थात, त्यानंतरही त्यांना डावाचा पराभव वाचवण्यात अपयश आले. दुसऱ्या डावात सन्मित्र संघाने 8 गुण  नोंदवले. सन्मित्रकडून कुशल कदमने 3 गुण मिळविले. 
 
14 वर्षांखालील गटात झालेल्या एका चुरशीच्या सामन्यात सन्मित्र संघाने क्रीडानिकेतनचे आव्हान अलाहिदा डावात (8-4) 4गुणांनी परतवून लावले. नियोजित वेळेत सामना 14-14असा बरोबरीत राहिला. विशेष म्हणजे दोन्ही डावही 9-9, 5-5 असो बरोबरीत राहिले. अलाहिदा डावात सन्मित्रच्या अथर्व गोंडेचे आक्रमण निर्णायक ठरले. त्याने अलाहिदा डावात 3 गडी बाद करता संपूर्ण सामन्यात सहा गडी बाद केले. त्याला कुशल कदमने एकूण 5 गुण नोंदवलून सुरेख साथ केली. क्रीडा निकेतनच्या सुरेश जैनावतने अलाहिदा डावात चांगले आक्रमण केले. पण, त्यांना केवळ चारच गुणांची नोंद घेता आली. यातील 3 गुण सुरेशने मिळविले. संपू्र्ण सामन्याच सन्मित्रकडून आदित्या ठोंबरेचा (1.20, 1.50 आ्णि 2.10मिनिटे) बचाव निर्णायक ठरला. 
 
स्पर्धेचे उदघाटन माजी उपमहापौर दिपक मानकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या क्रिडा विभागाचे प्रमुख खेमराज रणपिसे, मुख्याध्यापक सुनिल शिवले, टाटा मोटर्स चे युनियन प्रतिनिधी विलास सपकाळ यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी सामजिक कार्यकर्ते गणेश भराडे , पुणे जिल्हा सरचिटणीस शिरीन गोडबोले, सचिन गोडबोले, नानासाहेब झांबरे, चित्रपट चौकमधील कलाकार , संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड, अक्षय टांकसाळे, दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते नाणेफेक घेऊन सामना सुरू करण्यात आला.
 
अन्य निकाल (14 वर्षांखालील गट) 
आपली माती: 12 (5 आणि 7, पज्ञेश गायकवाड 1.40 व 1.10 मिनिटे आणि 2 गडी, वेदांत गाडेकर 1.20 मिनिटे) पराभूत वि. लोणी स्पोर्टस: 18 (8 आणि 10, रोहन खामकर 2.00 आणि 1 मिनिट, साहिल वडनिळे 1.30मि., 3,10 मिनिटे आणि 4 गुण, ऋषिकेश साळुंके 1.50 मिनिटे आणि 4 गुण, प्रशांत गुरु 3 गुण) सहा गुणांनी विजय 
 
अमर क्रीडा मंडळ:9 (सम्राट पांढरे 3 मिनिटे आणि 3 गुण, संभाजीराजे भोसले 3.30 मिनिट, सुकृत सफार 2.20 मिनिटे, आर्यन झेंड 2.10 मिनिटे, तन्मय निगुडकर 4 गुण) वि.वि. क्रीडा निकेतन:6(3 आणि 3) (घोडके सचिन 1.50मिनिटे) एक डाव 3 गुणांनी विजय 
 
रमणबाग: 14 (5 आणि 9, सुशांत कोळी 2.19 मिनिटे, 2 मिनिटे यश चव्हाण 1.40 मि., 1.50 मिनिटे, आयुश सुनके 3गुण, वेदांत गायकवाड 4 गुण) वि.वि. ईगल्स: 9 (4आणि 5) (रितेश राक्षे 3.40 मिनिटे, 2.50 मिनिटे, वेदांत पवार 2 गुण) सहा गुणांनी विजय
 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading