Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

महाबोधीध्यान, ज्ञान आणि दानातून बुद्ध पौर्णिमा साजरी

पुणे: मोहम्मद वाडी येथील लामा फेरा मॉनेस्ट्रीमध्ये ज्ञान, ध्यान आणि दानातून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी लामा फेरा इंटरनॅशनल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरचे संचालक डॉक्टर सत्येंद्र शुक्ला यांनी उपस्थितांना बुद्ध पौर्णिमेचे महात्त्म समजून दिले व आयुष्यात ध्यान आणि दानचे महत्त्व स्पष्ट केले. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर प्रसंगी यंगेस्ट लामा हिलर सारा सत्येंद्र शुक्ला हिने सादर केलेल्या नृत्यकलेने सर्वांची मने जिंकली.

बुध्द पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाबोधी ध्यान करण्यासाठी पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या ममता सदन येथील विद्यार्थिनीं देखील सहभागी झाल्या होत्या. लामा फेरा फाऊंडेशन तर्फे संस्थेला अर्थसाह्य देखील यावेळी करण्यात आले. तसेच महाबोधी ध्यानासाठी शहराच्या विविध भागांतील लामा, व बुध्द अनुयायी मोठया संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्वांसाठी ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading