Wednesday, April 29, 2026
Latest NewsPUNE

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना २८३ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

पुणे : अजिंक्य योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८३ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारवाड्यावरील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, उदय कुलकर्णी, संस्थेचे सचिव कुंदनकुमार साठे, विश्वस्त श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षिरसागर, तसेच, विश्वनाथ भालेराव, किशोर येनपुरे, जगन्नाथ लडकत, ॲड. मंदार जोशी यावेळी उपस्थित होते.

मोहन शेटे म्हणाले, शिवरायांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. बाजीराव पेशवे यांच्या कर्तृत्वामुळे आजचा भारत बघायला मिळतोय, असेही शेटे यांनी सांगितले.

कुंदनकुमार साठे म्हणाले, एनडीए येथे बाजीराव पेशवे यांचा सर्वात भव्य असा पुतळा उभारण्यात आला आहे, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचा अनावरण सोहळा लवकरच होणार आहे. नाशिक जिल्‍ह्यातील सिन्‍नर तालुक्‍यातील दुबेरे हे थोरल्‍या बाजीराव पेशव्‍यांचे मामाचे गाव. याच गावात बाजीरावांचा जन्‍म झाला आणि येथेच त्‍यांचे बालपण गेले. या गावात देखील त्यांचा पुतळा उभारण्याचे लवकर सुरू होणार असल्याचे साठे यांनी सांगितले. भूषण गोखले यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading