fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

इझमायट्रिपचा प्रिमिअम ग्राहकांसाठी ईएमटी रॉयल उपक्रम

मुंबई : इझमायट्रिप या भारतातील अग्रगण्य ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठाने त्यांच्या अभिजात ग्राहकांसाठी इन्व्हाइट ओन्ली, विशेष उपक्रम ईएमटी रॉयल सादर करण्याची घोषणा केली. विशेष सदस्यांसाठी डिझाइन करण्यात आलेला हा उपक्रम काही टॉप ऑफ द लाइन डोमेन तज्ञांकडून निवडण्यात आलेल्या सर्वात लोकप्रिय व लक्झरीअस ट्रॅव्हल कॉन्सीर्ज सेवा उपलब्ध करून देईल. (EMT Royal initiative for premium customers of easemyTrip)

इझमायट्रिपच्या अभिजात ग्राहकांसाठी हा प्रिमिअम सदस्यत्व-आधारित उपक्रम आहे. ईएमटी रॉयलच्या माध्यमातून ते फ्लाइट व हॉटेल बुकिंग्ज आणि हॉलिडे, चार्टर व क्रूझ पॅकेजेसशी संबंधित उच्च सानुकूल व बीस्पोक सेवांचा लाभ घेऊ शकतात.

ईएमटी रॉयल उपक्रमात पहिल्या काही सदस्यांसाठी विश्रांतीकरिता प्रवास करण्यावर वार्षिक खर्चावर आधारित मर्यादित इन्व्हाइट ओन्ली उपक्रम, बिझनेस आणि फर्स्ट-क्लास फ्लाइट बुकिंग्जवर विशेष सेवा, मूल्यवर्धित सेवा व फायद्यांसह हॉटेल बुकिंग्जवर सर्वोत्तम दर, प्रवाशांच्या आवश्यकता व प्राधान्यांनुसार सानुकूल केलेले बीस्पोक हॉलिडे पॅकेजेस, प्रवासी आणि त्यांच्या प्रियजनांसाठी वैयक्तिकृत व आलिशान चार्टर अनुभव, विशेषरित्या क्यूरेट व वैयक्तिकृत केलेल्या सेवांसह जगातील अव्वल व सर्वोत्तम क्रूझेसची उपलब्धता, त्वरित शंका निरसनसाठी आणि प्रभावी ग्राहक सेवेसाठी उच्च पात्र ट्रॅव्हल तज्ञांची समर्पित टीम उपलब्ध आदी सेवांचा समावेश आहे.

इझमायट्रिपचे सह-संस्थापक रिकांत पिट्टीम्हणाले, “आम्ही आमच्या अभिजात ग्राहकांचे त्यांची निष्ठा व सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी आभार मानतो आणि विशेष ऑफर्ससह त्यांना सर्वोत्तम सेवा देण्यास उत्सुक आहोत. ईएमटी रॉयल उपक्रम सुरू करणे हा आमच्या अभिजात पर्यटकांना बीस्पोक ट्रॅव्हल कॉन्सीर्ज सेवा देण्याच्या दिशेने प्रयत्न आहे, जे त्यांच्या गरजा व स्वादाला अनुसरून सर्वोत्तमपणे तयार करण्यात येतील. हा उपक्रम आमच्या प्रिमिअम ग्राहकांप्रती आमची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आमच्या ब्रॅण्डप्रती त्यांच्या अविरत कटिबद्धतेसाठी त्यांना पुरस्कारित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading