Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

म्हाडाकडून आणि कंत्राट दिलेल्या कंपनीकडून वारंवार २०२३ ची सोडत कशी पारदर्शक आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न – शर्मिला येवले

पुणे: २० मार्च २०२३ रोजी म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत जाहीर करण्यात आली.पण या सोडतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रारिक त्रुटी होत्या हे वारंवार पुणे मंडळ आणि कंपनीच्या लक्षात आणून देऊन सुद्धा यावर काम न करता नागरिकांची फसवणूक केली गेली आणि जात आहे. मुळात पहिला प्रश्न हा उपस्थित होतो की आधीच सॉफ्टवेअर असताना नवीन सॉफ्टवेअरचा घाट कशासाठी जर आधीच सॉफ्टवेअर योग्य होते तर त्यात सुधारणा करून देखील लॉटरी काढता आली असती. परंतु म्हाडा पुणे मंडळाकडे पैसे जास्त झाल्यामुळे त्यांनी नवीन कंपनीला कंत्राट देत पारदर्शकतेचा ढोल वाजवला. परंतु वास्तवात अस काही झाले नाही मी स्वतः देखील फॉर्म भरत असताना मला असंख्य अडचणी फॉर्म भरताना आल्या आहेत.आणि त्यानंतर त्याच्या पात्र विजेत्यांच्या तक्रारी देखील आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहे .त्यामुळे या कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्यात यावं आणि २०२३ ची सोडत पूर्णतः रद्द करण्यात यावी तसेच या कंपनीकडे कोकण मंडळ, औरंगाबाद,मुंबई ह्या विभागांच्या लॉटरीचा देखील कंत्राट दिलेल आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे ह्या कंपनीकडून हे कंत्राट काढून घेण्यात यावं आणि ही कंपनी ब्लॅकलिस्ट करण्यात यावी. जर असं केलं नाही तर सोमवारी पुणे मंडळाच्या समोर आम्ही २५ नागरिक आत्मदहन करू.कृपया याची गांभर्याने नोंद घ्यावी.अशी मागणी शर्मिला येवले यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading