‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बस सेवा पुन्हा सुरू; सफरही होणार गारेगार
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांची सफर नागरिक व पर्यटकांना घडविण्यासाठी
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ हि बससेवा २०१९ पासून सरू करण्यात आली आहे. मात्र काही कारणास्थाव ही बस सेवा तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. परंतु पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ही बस सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ सफर घडवण्यासाठी दोन वातानुकुलीत बस सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरा पाठोपाठ आता ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ सफरही गारेगार होणार आहे. येत्या 1 मे या महाराष्ट्र दिनापासून ही सफर सुरू करण्यात येणार असल्याचे पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कळवण्यात आले आहे. निगडी (भक्ती शक्ती) बसस्थानक येथून ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा सकाळी ०९:०० वाजता सुरु होणार आहे.
‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा ऐतिहासिक / प्रेक्षणीय स्थळांची माहिती खालीलप्रमाणे –
१. भक्ती शक्ती उद्यान (रनिंग)
२. प्रतिशिर्डी शिरगांव
३. देहुगांव (मुख्य मंदिर)
४. देहू गाथा मंदिर
५. बर्ड व्हॅली
६. सायन्स पार्क
७. चाफेकर बंधू स्मारक (रनिंग)
८. श्री. मोरया गोसावी मंदिर
९. मंगलमुर्ती वाडा
१०. चाफेकर वाडा
११. इस्कॉन मंदिर
१२. अप्पूघर / दुर्गा टेकडी
- ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवेमध्ये प्रतिप्रवासी रक्कम रु. ५००/- तिकीट दर आकारणी करण्यात येणार आहे.
- ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बसेसचे तिकीट वितरण निगडी, भोसरी व पिंपरी लोखंडे भवन येथील पास केंद्रावर उपलब्ध
असणार आहेत. - वेळे अभावी पर्यटन स्थळ / ठिकाण वगळले जावू शकते याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
- सदर बसची वेळ सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०७:१५ अशी राहील.
