जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू
पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटात खासगी बसला झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते २५ वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे.बाजीप्रभूव ढोल ताशा पथकातील हे सर्वजण आहेत.
पुण्याहून मुंबईला जात असताना लोणावळ्याजवळ असणाऱ्या बोरघाटात पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.null
अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. स्वप्नील श्रीधर धुमाळ वय १६ वर्ष, सतिश श्रीधर धुमाळ, वय २५ वर्ष अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय अपघातात जुई दिपक सावंत, वय १८ वर्ष, यश सुभाष यादव, कुमार वीर कमलेश मांडवकर, वय ६ वर्ष, कुमारी वैभवी साबळे, वय १५ वर्ष यांचाही मृत्यू झाला.
मनीष राठोड, वय २५ वर्ष, कृतिक लोहित, वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई, राहुल गोठण, वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.
अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
