Sunday, October 18, 2026
Latest NewsPUNE

रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तृतीयपंथी बांधवांकडून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या राबविण्यात आलेल्या ‘एक वही एक पेन अभियाना’ला संस्थेकडून शैक्षणिक साहित्य 500 वह्या, 500 पेन व 500 पेन्सिल देण्यात आल्या.

यावेळी रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामा भोरकडे, खजिनदार निलेश पवार, सचिव सिद्धी  कुंभार, उपाध्यक्ष रितिका परमार, महापालिकेचे अधिकारी किरण गायकवाड, रयत विद्यार्थी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, राज्य समन्वयक श्वेता ओव्हाळ, मीनाक्षी घोडके, रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे तृतीयपंथी सामाजिक सदस्य रिद्धी जाधव, आरोही राठोड, रोहिणी मोरे आदी उपस्थित होते.
 रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या सर्व तृतीयपंथीयांचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने किरण गायकवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन संस्थेला व तृतीयपंथी बांधवांचा सन्मान करण्यात आला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading