भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर जयत्तीनिमित्त दलित युवकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात टॅकरचे वितरण
–दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (डिक्की) च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन –
पुणे : दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (डिक्की) च्या संयोजनाने व पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या प्रयत्नातून देशभरात स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून दलित युवकांसाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक घटक म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज पुण्यात डिझेल ,पेट्रोल टॅकरचे वितरण दलित युवकांना करण्यात आले . हा वितरण समारंभ पालकमंत्री मा. ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी
पाटील यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केले.तसेच यावेळी संपूर्ण महाराष्टातील दलीत युवकांना पेट्रोल ,डिझेल टँकर च्या चाव्या देण्यात आल्या .
भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अतिशय उपयुक्त आणि रोजगार निर्माण करणारा आणि माणसाचे जीवन समृद्ध करणारा हा उपक्रम असून हेच खरे आंबेडकरांना व त्यांच्या विचारांना अभिवादन असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उद्घाटन प्रसंगी म्हणाले.
डिक्कीचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे, डिक्कीचे महाराष्ट्र अध्यक्ष मुकुंद कमलाकर, अविनाश जगताप, सातारा समन्वयक प्रसन्ना भिसे , महिला समनव्यक सीमा कांबळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .
