Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

तिसरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमाला शुक्रवार पासून

पुणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे तिसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणा-या समाजसुधारकांपैकी महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.आंबेडकर हे होते. त्यामुळे त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात येत आहे. दिनांक १४ ते २३ एप्रिल दरम्यान दररोज रात्री ८ वाजता ही व्याख्यानमाला आॅनलाईन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटस्चे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.

व्याख्यानमालेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील बाबासाहेब सर्वांचे, शाहिरांचे भीमराव, डॉ.आंबेडकर भारतीय संविधान व सद्यस्थिती, डॉ.आंबेडकर व शिक्षणाचे महत्व, डॉ.आंबेडकरांचे शेतीविषयक विचार, डॉ.आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीतील योगदान, जल व ऊर्जा या विषयातील योगदान, डॉ.आंबेडकरांचे आर्थिक विचार अशा विविध विषयांवर नामवंत वक्ते आपले विचार मांडणार आहेत. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या https://www.youtube.com/c/JadhavarGroupAdvShardulraoSudhakarraoJadhavar या यू टयूब पेजवरुन ही व्याख्याने प्रसारित होणार आहेत.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, व्याख्यानमालेचे उद््घाटन प्रा.सुभाष वारे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. तर, शाहीर हेमंतराजे मावळे, दलित पँथरचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जांबुवंत मनोहर, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ निवृत्त मराठी विभागप्रमुख अविनाश सांगोलकर, युवक क्रांती दल पुणे शहर उपाध्यक्ष नीलम पंडित, एमआयटी महाविद्यालय बाबासाहेब आंबेडकर अध्यासन सेक्रेटरी प्रा.विनोदकुमार जाधव, कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, साहित्यिक वि.दा.पिंगळे यांसह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर यांच्या व्याख्यानाने मालिकेचा समारोप होणार आहे. सर्व व्याख्याने विनामूल्य असून विद्यार्थी व तरुणाईने मोठया संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading