मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अयोध्येत शक्तीप्रदर्शन
अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदार, खासदारांसह रविवारी अयोध्येत पोहोचले. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी राम लल्लाच्या मंदिरात पूजा केली. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र सरकारचे अनेक मंत्री, पक्षाचे खासदार आणि आमदारांसह शिवसैनिकही उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच अयोध्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत आपल्या आमदारांसोबत शक्तीप्रदर्शन केले. येथे मोठ्या सभेला संबोधित करताना शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारण्याचे स्वप्न होते, जे पंतप्रधान मोदींनी पवित्र भूमीवर मंदिराचे बांधकाम सुरू करून पूर्ण केले. ते म्हणाले, “अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर बांधणे हे बाळासाहेब ठाकरे आणि लाखो राम भक्तांचे स्वप्न होते, राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात करून पंतप्रधान मोदींनी हे स्वप्न साकार केले आहे’.
एकनाथ शिंदे म्हणाले, संपूर्ण वातावरण भगवेमय झालं आहे. राममय झाले आहे. आज राममंदिराच्या उभारणीचे कामही पाहिले. सगळ्यांना वाटायचं की राम मंदिर कसं बांधणार? लोक म्हणायचे ‘मंदिर वहीं बनाएंगे, लेकिन तारीख नहीं बताएंगे? पण पीएम मोदींनी ते करून दाखवलं आणि तारीखही सांगितली. जे शंका उपस्थित करत होते, त्यांना घरी बसवलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना रामायणातील ‘रावण’ या पात्राची उपमा दिली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “देशात रामाचे राज्यच चालेल… रामाला मानणारेच देशावर राज्य करतील.” उद्धव यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करतना ठाकरे म्हणाले, रामाचा अपमान करणारे घरी बसले आहे आणि जे रामला मानायचे ते राज्य करत आहेत.’null
आमदार रवी राणा म्हणाले, ‘जे रामाचे नाही, जे हनुमानाचे नाही, त्यांचा काही उपयोग नाही. उद्धव यांनी जे केले, त्याचे परिणाम आज भोगत आहेत.’ एकनाथ शिंदे रविवारी सकाळी अयोध्येतील रामकथा हेलिपॅडवर पोहोचले. येथील राम मंदिरात महाआरतीला उपस्थित राहून त्यांनी मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी संतांचीही भेट घेतली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, येथील वातावरण पाहून आपण आनंदी आणि समाधानी आहोत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री झाल्या नंतर मी पहिल्यांदा इथे आलो. माझ्यासह सगळे मंत्री देखील आलेत. माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. यापूर्वी मी नियोजन करण्यासाठी यायचो. आता माझ्या कार्यकर्त्यांनी नियोजन केले. माझ्यासोबत सगळ्या सरकारने दर्शन घेतले आहे. अनेकांना या दौऱ्याने एलर्जी झाली आहे.
