fbpx

न्यू हॉलंड अॅग्रिकल्चरने पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात फिरता दवाखाना सुरू केला

पुणे: सीएनएच उद्योगाचा (CNH Industrial) एक भाग असलेल्या न्यू हॉलंड अॅग्रिकल्चरने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत म्हणून पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात फिरता वैद्यकीय दवाखाना (MMD) सुरू केला आहे. पुण्याच्या ३५-४० किलोमीटरच्या परिघात गरजू लोकांना हा दवाखाना मूलभूत आरोग्य सेवा पुरवेल. या उपक्रमाद्वारे, ब्रॅंडचे उद्दिष्ट दरवर्षी १५,००० हून अधिक व्यक्तींना लाभ मिळवून देण्याचे आहे.

    मेडिहेल्प फाऊंडेशनद्वारे संचलित, एमएमडी रक्तातील ग्लुकोज चाचणीसह पॉइंट ऑफ केअर डायग्नोस्टिक्स म्हणजे रुग्णापाशी जाऊन चाचणीची सुविधा पुरवेल. उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसाठी तपासणी देखील केली जाईल आणि पाठपुरावा तपासण्या पाक्षिक आधारावर दिल्या जातील. याव्यतिरिक्त, एमएमडी आवश्यकतेप्रमाणे  रुग्णांच्या संदर्भानुसार वैद्यकीय सेवा देखील पुरवेल.

    न्यू हॉलंड, भारतच्या सीएसआर लीड श्रीमती कविता साह म्हणाल्यान्यू हॉलंड अॅग्रिकल्चर आपल्या आसपासच्या समुदायांचे ऋण फेडण्यासाठी वचनबद्ध आहे आणि आमचा फिरता वैद्यकीय दवाखाना त्या समुदायातील लोकांची काळजी घेण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही गरजू लोकांना मूलभूत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी समर्पित आहोत. आम्ही आशा करतो की, त्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल आणि या समुदायांच्या सर्वांगीण कल्याणासाठी हातभार लागेल.

एक डॉक्टर आणि एक चिकित्सा सहाय्यक (नर्स) असलेल्या एमएमडीने वाशिरे, तरडेवाडी, भरतेवाडी, कडलकवाडी, गणेशवाडी, देशमुख, करवंदेवाडी यांसारख्या इतर २० हून अधिक वाड्यावस्त्यांना भेट देणे अपेक्षित आहे.

    हा उपक्रम न्यू हॉलंड अॅग्रिकल्चरच्या साल २०१६ पासून ग्रेटर नोएडाच्या आसपासच्या १५ गावांमध्ये कार्यरत असलेल्या आणि दरवर्षी १६,००० पेक्षा जास्त लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या मोबाइल अॅम्ब्यूलन्स ऑन व्हील प्रकल्पाचा विस्तार आहे.

    १२५ वर्षांच्या आपल्या इतिहासासह, न्यू हॉलंड अॅग्रिकल्चर नावीन्यपूर्ण आणि कल्पक कृषी उपाय प्रदान करते. जसे कि, ट्रॅक्टर्सची विस्तृत श्रेणी, कंबाइन हार्वेस्टर, बेलर्स आणि कृषी अवजारांची एक अशी श्रेणी जी मशागत, वृक्षारोपण, कापणी, कापणीनंतरची कामे, व्यावसायिक कामे आणि वाहतूक यांसारख्या अनेक वेगवेगळ्या अनुप्रायोगांमध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवते.

Leave a Reply

%d bloggers like this: