Sunday, May 31, 2026
Latest NewsPUNE

श्री जंगली महाराज देवस्थानाच्या उत्सवाला सुरुवात

पुणे : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या समाधीस सकाळी ७ वाजता अभ्यंगस्नान घालून पूजा करण्यात आली. यावेळी श्री जंगली महाराज यांच्या समाधीस आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. सनईच्या मंगलमय सुरावटीने देवस्थानचा परिसर भक्तिमय झाला. यावेळी समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

सद्गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त देवस्थान परिसरात विविधरंगी दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. समाधीस अभ्यंगस्नानानंतर ‘श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ’ यांनी भजन सादर केले. त्यानंतर आरती झाली. त्यापूर्वी सकाळी ६ वाजता आढाव बंधू यांचे सनईवादन झाले.

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने व सद््गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समितीच्या सहभागाने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३३ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. बुधवार, दिनांक २२ मार्च ते बुधवार, ५ एप्रिल २०२३ दरम्यान जंगली महाराज मंदिरात उत्सव होणार आहे. उत्सवात धार्मिक कार्यक्रम भजने, व्याख्याने आणि संगीत सभा होणार आहेत.

ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. तसेच, सद््गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समिती व श्री सद््गुरु जंगली महाराज भजनी मंडळ यांनी देखील उत्सवात सहभाग घेतला आहे. उत्सवात भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading