Wednesday, May 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

मुंबई : बहुचर्चित बुकी अनिल जयसिंघानीला आज गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयंिसघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या सात वर्षापासून जयसिंघानी फरार होते. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. अमृता फडणवीस यांच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिस शोध घेत होते. अखेल गुजरातमधून त्यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयंिसघानीला अटक करण्यात आली होती.

हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर अनिक्षा आणि अनिल जयंिसघानी यांच्यासंदर्भात अनेक धक्कादायक माहिती समोर आल्या आहेत.अनिक्षाने आपल्या वडिलांची एका गुन्हेगारी प्रकरणातून सुटका करण्यासाठी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याचा आरोप आहे.

अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिका-यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिका-याने दिली आहे. अनिल जयंिसघानी यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस अनिल जयसिंघानी यांचा शोध सुरु होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading