भारती विद्यापीठ आयएमईडी तर्फे छोट्या व्यावसायिकांना उद्योजकता प्रशिक्षण
पुणे :भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी)तर्फे छोट्या व्यावसायिकांना ‘कम्युनिटी वर्क थ्रू आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट २०२३’ या उपक्रमांतर्गत उद्योजकतेविषयी,विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ सचिन वेर्णेकर,डॉ.भारती जाधव,डॉ श्रद्धा वेर्णेकर,डॉ श्याम शुक्ल,दीपक नवलगुंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या साहाय्याने छोट्या व्यावसायिकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले.कस्टमर केअर,फायनान्स,ऑनलाईन विक्री आदी कौशल्यांचा समावेश होता.पाणी पुरी विक्रेते,भेळ विक्रेते,मातीची भांडी -मूर्ती करणारे कारागीर अशा छोट्या व्यावसायिकांना या उपक्रमाचा लाभ झाला.
तसेच,याच दरम्यान सी-गुगली आंतर महाविद्यालयीन तंत्रज्ञान विषयक स्पर्धेचे पारितोषिक वितरण,मार्केटिंग सेमिनार हे उपक्रम उत्साहात पार पडले.