fbpx

ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत विजय सुरवाडे यांच्या भेटीला बाटीऀ चे महासंचालक सुनील वारे

पुणे  : हदयविकराच्या आजारामुळे ठाण्याच्या गोडबोले रुग्णालयात उपचार घेत असणारे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ साहित्यिक ,विचारवंत विजय सुरवाडे यांची आज डॉ.बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बाटीऀ) चे नवनियुक्त महासंचालक सुनील वारे यांनी आज भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली .तसेच यावेळी महामानव या चित्रमय ग्रंथाचे मानधन एक लाख वीस हजार रुपयाचा धनादेश दिला .यावेळी आपण लवकर बरे होऊन आपले ऐतिहासिक लेखन आणि इतर कार्य लवकर पूर्ण करावे अशा सदिच्छा वारे यांनी यावेळी दिल्या.

सुरवाडे यांनी यावेळी आपण लवकर बरे होणार असून डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे चित्रमय चित्रमय ग्रंथाच्या कार्य जगभर पोहचवण्याचा संकल्प व्यक्त केला .

महासंचालक सुनील वारे यांनी सुरवाडे यांच्या डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित असणाऱ्या चित्रमय ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती लवकरच निर्माण करण्याचे आश्वासन सुरवाडे यांना दिले . यावेळी डॉ.बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बाटीऀ) च्या वतीने वारे यांनी साहित्यिक विजय सुरवाडे यांना त्यांनी केलेल्या कार्याचे सन्मानपत्र देऊन त्यांना सदिच्छा देण्यात आल्या .

Leave a Reply

%d bloggers like this: