fbpx

चेस सायमल्समध्ये ६० हून अधिक मुलांनी घेतला ग्रँडमास्टर्स’सोबत बुद्धिबळ खेळण्याचा अनुभव  

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळात नाव कमाविलेल्या बुद्धिबळपटूकडून खेळाचे प्रशिक्षण घेण्याची संधी पुण्यातील ६० हून अधिक मुलांनी अनुभवली. निमित्त होते, ३२ व्या पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेअंतर्गत आयोजित चेस सायमल्स या विशेष फेरीचे.

पीवायसी हिंदू जिमखाना याठिकाणी आयोजित या विशेष फेरीत १० ग्रँडमास्टर सहभागी झाले होते. एकूण १० गटात खेळाडू विभागण्यात आले होते. एक ग्रँडमास्टर विरूध्द ६ खेळाडू असे या विशेष फेरीचे स्वरूप होते. यामध्ये ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद, सूर्य शेखर गांगुली, मुरली कार्तिकेयन, अधिबान बी, सेथुरामन एसपी, ललित बाबू एमआर, अभिजीत गुप्ता, सौम्या स्वामीनाथन, पद्मिनी राऊत आणि गोम्स मेरी अॅन हे ग्रँडमास्टर या खेळामध्ये सहभागी झाले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: