fbpx

पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग 2023 स्पर्धेत एक्स्कॅलिबर्स्, कुकरीज, मस्कीटर्स संघांचे विजय   

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत एक्स्कॅलिबर्स्, मस्कीटर्स, कुकरीज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत कुकरीज् संघाने किर्पान्स संघाचा 12-11 असा संघर्षपूर्ण पराभव केला. बॅडमिंटनमध्ये अनिश राने, आदित्य गांधी, नैमिश पालेकर, गंधार देशपांडे, रिशीका आपटे, जयकांत वैद्य, संध्या भट यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कुकरीज् संघाने किर्पान्सला 4-4 असे बरोबरीत रोखले. टेबलटेनिसमध्ये देखील  कुकरीज्  व किर्पान्स यांच्यातील लढत 4-4 अशी बरोबरीत सुटली. टेनिस प्रकारात रघुनंदन बेहेरे, आदित्य अभ्यंकर, नील केळकर, संतोष शहा, अमित महाजनी, राहुल गांगल यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर कुकरीज् संघाने किर्पान्सचा 4-3 असा पराभव करून विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात एक्स्कॅलिबर्स् संघाने तलवार्स संघाचा 12-11 असा पराभव करून तिसरा विजय नोंदवला. बॅडमिंटनमध्ये एक्स्कॅलिबर्स् संघाला तलवार्स संघाने 3-5 असे पराभूत केले. तर, टेबल टेनिसमध्ये एक्स्कॅलिबर्स् संघाने तलवार्स संघाला 4-4 असे बरोबरीत रोखले. टेनिसमध्ये मात्र, एक्स्कॅलिबर्स् संघाने तलवार्स संघाचा 5-2 असा एकतर्फी पराभव करून विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात मस्कीटर्स संघाने कोल्टस संघाचा 17-06 असा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गट साखळी फेरी: 
कुकरीज् वि.वि.किर्पान्स 12-11
बॅडमिंटन: कुकरीज् बरोबरी वि.किर्पान्स 4-4(अनिश राने/आदित्य गांधी वि.वि.केदार नाडगोंडे/मिहीर केळकर 30-17; मकरंद चितळे/आकाश सुर्यवंशी पराभुत वि.सारंग आठवले/संग्राम पाटील 00-30; नैमिश पालेकर/गंधार देशपांडे वि.वि.अजिंक्य मुठे/अभिजीत राजवाडे 30-22; ईशान लागु/रोहीत मेहेंदळे पराभुत वि.विनीत रुकारी/ऋषिकेश पेंडसे 17-30; प्रांजली नाडगोंडे/तन्मय चितळे पराभुत वि.अविनाश दोशी/गिरीश खिंवसरा 13-30; रघुनंदन बेहेरे/रिशीका आपटे वि.वि.समीर सावला/नील बेलवलकर 30-29; दत्ता देशपांडे/आदित्य अभ्यंकर पराभुत वि.आमीर आजगावकर/चिन्मय चिरपुटकर 10-30; जयकांत वैद्य/संध्या भट वि.वि.विश्वेश देशपांडे/वेदिका राठी 30-26);
 
टेबल टेनिस: कुकरीज्  बरोबरी वि.किर्पान्स 4-4(आशिष बोड्स/आदित्य अभ्यंकर पराभुत वि.विश्वेश देशपांडे/संकल्प गोयल 21-30; शिरीष कर्णिक/तन्मय चितळे वि.वि.मिहीर केळकर/किरण गर्गे 30-17; नील केळकर/अनिश राणे वि.वि.नितीन पेंडसे/नील बेलवलकर 30-10;  आदित्य गांधी/रघुनंदन बेहेरे पराभुत वि.केदार नाडगोंडे/राजेश भट 20-30; गंधार देशपांडे/ईशान लागु वि.वि.संग्राम पाटील/अजिंक्य मुठे 30-27; वेंकटेश कशेलीकर/प्रांजली नाडगोंडे  पराभुत वि.समीर सावला/सौरभ चिंचणकर 27-30; मकरंद चितळे/प्रशांत पंत वि.वि.अभिजीत मराठे/अनुज छाजेड 30-29; रोहीत अगरवाल/अमित धर्मा पराभुत वि.राहुल मुथा/विराज खानविलकर 21-30);  
 
टेनिस: कुकरीज् वि.वि.किर्पान्स 4-3(रघुनंदन बेहेरे/आदित्य अभ्यंकर वि.वि.अजिंक्य मुठे/अभिजीत गानु 30-21; नील केळकर/संतोष शहा वि.वि.राहुल मुथा/अभिजीत मराठे 30-13;  संजीव घोलप/क्षितीज नाहर पराभुत वि.संग्राम पाटील/रोनित मुथा 18-30; अमित महाजनी/राहुल गांगल वि.वि.नील बेलवलकर/आशिष कुबेर 30-29; केतकी पटवर्धन/प्रांजली नाडगोंडे पराभुत वि.आरिन माळी/सौरभ चिंचणकर 10-30; साकेत गोडबोले/प्रीती मराठे पराभुत वि.समीर सावला/चिन्मय चिरपुटकर 18-20; आदित्य गांधी/अनिश राणे वि.वि.शरयू राव/विराज खानविलकर 20-18). 
 
 
एक्स्कॅलिबर्स् वि.वि.तलवार्स 12-11
बॅडमिंटन: एक्स्कॅलिबर्स् पराभुत वि.तलवार्स 3-5(मधुर इंगळहळीकर/अनिश रुईकर पराभुत वि.तन्मय चोभे/दिप्ती सरदेसाई 26-30; तेजस चितळे/राधिका इंगळहळीकर पराभुत वि.तेजस किंजवडेकर/सिद्धार्थ मराठे 24-30;  अनिकेत सहस्त्रबुद्धे/अमर श्रॉफ वि.वि.देवेंद्र चितळे/प्रशांत वैद्य 30-27; आनंद शहा/गिरीश मुजुमदार पराभुत वि.बाळ कुलकर्णी/कर्ना मेहता 22-30;  निनाद देशमुख/अभिजीत खानविलकर वि.वि.सचिन जोशी/मनीष शहा 30-26; विश्वेश कटक्कर/ संदीप तपस्वी पराभुत वि.कपिल बाफना/सुदर्शन बिहानी 25-30; विक्रम ओगळे/अभिषेक ताम्हाणे पराभुत वि.विनीत राठी/अतुल ठोंबरे 27-30; नेहा लागु/अक्षय ओक वि.वि.तेजस्विनी देशमुख/किर्ती श्रॉफ 30-09);
 
टेबल टेनिस: एक्स्कॅलिबर्स् बरोबरी वि.तलवार्स 4-4(मधुर इंगळहळीकर/अभिषेक ताम्हाणे पराभुत वि.रणजीत पांडे/देवेंद्र चितळे 11-30; केदार देशपांडे/सचिन बेलगलकर वि.वि.मिहीर ठोंबरे/सिद्धार्थ निवसरकर 30-26; आनंद शहा/शुभांकर भाजेकर वि.वि.आदित्य पावनगडकर/तन्मय चोभे 30-18; मकरंद फडणीस/राधिका इंगळहळीकर पराभुत वि.तेजस किंजवडेकर/अतुल ठोंबरे 19-30; निनाद देशमुख/तनिश बेलगलकर पराभुत वि.कुणाल भुरट/अतुल किल्लेदार 21-30; अंकुश मोघे/गिरीश मुजुमदार वि.वि.कर्ना मेहता/रियान माळी 30-28; तेजस चितळे/अक्षय ओक वि.वि.विनायक भिडे/कपिल बाफना 30-21; आशिष देसाई/वेद मोघे पराभुत वि.मनिष शहा/सचिन जोशी 21-30; 
 
टेनिस: एक्स्कॅलिबर्स् वि.वि.तलवार्स 5-2(तनिश बेलगलकर/केदार देशपांडे पराभुत वि.मिहीर दिवेकर/तन्मय चोभे 29-30; अभिषेक ताम्हाणे/राजेंद्र कांगो वि.वि.निशांत भणगे/तेजस किंजवडेकर 30-12; मधुर इंगळहळीकर/अंकुश मोघे पराभुत वि.शिव जावडेकर/आनंद परचुरे 24-30; अभिजीत खानविलकर/वेद मोघे वि.वि.विजय ओगळे/रियान माळी 11-30;शुभांकर भाजेकर/पराग टेपण वि.वि.देवेंद्र चितळे/शिरीष साठे 30-26;नेहा ताम्हाणे/निनाद देशमुख वि.वि.चारुदत्त साठे/सोहिल गाला 20-12;विश्वेश कटक्कर/तेजस चितळे वि.वि.सिद्धार्थ निवसरकर/कर्ना मेहता 20-16).          
 
मस्कीटर्स वि.वि.कोल्टस 17-06
 
बॅडमिंटन: मस्कीटर्स वि.वि.कोल्टस 6-2(प्रथम वाणी/आदिती रोडे वि.वि.ईशान तळवळकर/सारा नवरे 30-26;  पराग चोपडा/तुषार नगरकर वि.वि.विक्रांत पाटील/मिहीर आपटे 30-26; यश काळे/अमित नाटेकर पराभुत वि.नितीन कोनकर/चैत्राली नवरे 00-30;  विश्वास मोकाशी/गौतम मलकर्णेकर पराभुत वि.समीर जालन/राजश्री भावे 00-30;  ईशान भाले/चिन्मय जोशी वि.वि.अनुज मेहता/सृष्टी राठोड 30-18; निलेश केळकर/आशुतोष सोमण वि.वि.तुषार मेंगळे/नकुल बेलवलकर 30-22;  आनंद घाटे/सिद्धार्थ खिवंसरा वि.वि.राहुल पाठक/अनुज साबडे 30-26;  समित आजगावकर/अनिल आगाशे वि.वि.ओजस साबडे/क्षितीज कोतवाल 28-30; 
 
टेबल टेनिस:मस्कीटर्स वि.वि.कोल्टस 6-2(पराग चोपडा/सिद्धार्थ मराठे पराभुत वि.राहुल पाठक/नितीन कोनकर 13-30; शिल्पा पांडे/संजय बामणे वि.वि.वर्षा बदामीकर/नकुल बेलवलकर 30-19; तुषार नगरकर/अमित नाटेकर पराभुत वि.विक्रांत पाटील/अनुज मेहता 27-30; जयदीप वाकणकर/आनंद घाटे वि.वि.रोहन जमेनीस/समीर बेलवलकर 30-25;गौतम मलकर्णेकर/अमित पाटणकर वि.वि.अनुज साबडे/क्षितीज कोतवाल 30-25; भाग्यश्री देशपांडे/संजय शहा वि.वि.तुषार मेंगळे/चैत्राली नवरे 30-20;  प्रथम वाणी/प्रियदर्शन डुंबरे वि.वि.समीर जालन/ईशान तळवळकर 30-22;   ईशान भाले/अंकिता अगरवाल वि.वि.राजश्री भावे/यश शहा 30-21)  
 
टेनिस: मस्कीटर्स वि.वि.कोल्टस 5-2(सिद्धार्थ मराठे/सन्मय तेलंग वि.वि.सुंदर अय्यर/अथर्व अय्यर 30-06; अमित नाटेकर/जयदीप वाकणकर पराभुत वि.रोहन जमेनीस/क्षितीज कोतवाल 00-30; अमित पाटणकर/अर्णव काळे वि.वि.अनुज साबडे/धनंजय धुमाळ 30-24;रिया वाशीमकर/तुषार नगरकर वि.वि.वैजंती मराठे/अनुज मेहता 30-13; आश्विन हळदणकर/प्रियदर्शन डुंबरे वि.वि.राहुल रोडे/ओजस साबडे 30-08; मधुरा टेंबे/भाग्यश्री देशपांडे वि.वि.आश्विन गिरमे/शितल अय्यर 20-15; ईशान भाले/अनुष्का परांजपे पराभूत वि.ईशान तळवळकर/राहूल पाठक 18-20).  

Leave a Reply

%d bloggers like this: