fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे 2023 H’ness CB350 आणि CB350RS लाँच

नवी दिल्ली – मध्यम आकाराच्या मोटरसायकल क्षेत्रात क्रांती घडवून आणत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आज OBD2B चे पालन करणाऱ्या 2023 H’ness CB350 & CB350RS लाँच केल्या आहेत. या नव्या मोटरसायकल्स मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देशभरातील सर्व बिगविंग वितरकांकडे उपलब्ध असतील. 2023 H’ness CB350 ची किंमत रू. २०९,८५७ पासून सुरू, तर CB350RS ची किंमत रू. २१४,८५६ पासून सुरू (एक्स शोरूम दिल्ली) आहे. एचएमएसआयने CB350 ग्राहकांसाठी कस्टमायझेशनचा नवा विभाग – माय सीबी, माय वे सुरू केला आहे. होंडा जेन्युईन अक्सेसरीज म्हणून विकले जाणार असलेले हे कस्टम किट्स मार्च २०२३ च्या अखेरपर्यंत बिगविंग वितरकांकडे उपलब्ध असतील.

नवी 2023 CB350s लाँच करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘सरकारने घालून दिलेल्या वेळमर्यादेआधीच एचएमएसआयने आपली उत्पादन श्रेणी नव्या नियमांनुसार तयार करण्यास सुरुवात केली होती. आज आम्ही OBD2B चे पालन करणाऱ्या भविष्यवेधी 2023 H’ness CB350 and CB350RS लाँच केल्या आहेत. स्थापनेपासूनच CB350s ला केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘माय सीबी, माय वे’ या नव्या कस्टमायझेशन विभागाअंतर्गत खास तयार करण्यात आलेले कस्टम किट्स CB350 च्या नव्या तसेच    सद्य ग्राहकांना आनंद देतील अशी आम्हाला खात्री वाटते.’

या घडामोडीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या प्रीमियम मोटरसायकल बिझनेस विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी  पी. राजागोपी म्हणाले, ‘नवा कस्टमायझेशन विभाग सुरू केल्यामुळे ग्राहकांना आता मोटरसायकलच्या माध्यमातून आपली अनोखी स्टाइल आणि व्यक्तिमत्त्व मांडता येणार आहे. माय सीबी, माय वे हा विभाग ग्राहकांच्या सातत्याने बदलत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला असून त्याची सुरुवात CB350 साठी बनवलेल्या कस्टम किट्सपासून करण्यात आली आहे. हे किट्स मार्च २०२३ च्या अखेरपर्यंत बिगविंग वितरकांकडे उपलब्ध होतील. आज आम्ही OBD2B चे पालन करणाऱ्या 2023 CB350 H’ness and CB350RS मोटरसायकल्स सरकारी वेळमर्यादेआधीच लाँच केल्या आहेत.’

H’ness CB350 मध्ये होंडाचे अभिजात डिझाइन आणि ठळक व्यक्तिमत्त्व यांची सांगड घालण्यात आली आहे. तिची स्टाइल नव्या युगातील मोटरसायकल चालकांना स्वतःचे अनोखे व्यक्तिमत्त्व मांडणारी वाटेलतर दुसरीकडे CB350RS आधुनिक स्टाइल आणि दर्जेदार स्टान्सचे उत्तम उदाहरण आहे.

आधुनिक CB350 मध्ये मोठे, ताकदवान, ३५० सीसी, एयर कुल्ड ४ स्ट्रोक ओएचसी सिंगल- सिलेंडर OBD2B चे पालन करणारे इंजिन पीजीएम- एफआय तंत्रज्ञानासह बसवण्यात आले आहे. याचा मॅक्स टॉर्क 30 Nm@3000 आरपीएम आहे.

सिलिंडरवर ठेवलेला मेन शाफ्ट कोएक्सियल बॅलेंसर प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही कंपने काढून टाकतो, ज्यामुळे ते दीर्घ राइड्ससाठी एक उत्तम साथीदार बनते, एक अत्यंत आकर्षक इंजिन अनुभव देते जे लाँग स्ट्रोक इंजिनमधून थ्रोब्स प्रसारित करते.

सिलेंडरवर बसवण्यात आलेला मेन शाफ्ट कोएक्सिल बॅलन्सर प्राथमिक आणि दुय्यम प्रकारची कंपने काढून टाकतो, ज्यामुळे ती दूरवरच्या प्रवासासाठी एक उत्तम साथीदार बनते आणि आकर्षक इंजिनचा फील लाँग स्ट्रोक इंजिनमधून थ्रोब्ज प्रसारित करते.

CB350 एक्झॉस्ट यंत्रणेमध्ये मोठी, ४५ मिमीची टेलपाइप देण्यात आली आहे, जी ठळक परंतु सौम्य स्वरुपाच्या आवाजाच्या निर्मितीचा समतोल साधते. एक्सपान्शन चेंबरमधील एका चेंबरचा एक आराखडा थ्रॉटल थंपिंग एक्झॉस्ट नोट डिलीव्हर करण्यास मदत करते.

इंजिनमध्ये ऑफसेट सिलेंडर पोझिशन वापरण्यात आली आहे, जी स्लायडिंग फ्रिक्शन कमी करते आणि असिमेट्रिकल कनेक्टिंग रॉड कंबशनवेळेस उर्जा कमीत कमी प्रमाणात खर्च होईल याची खात्री करते. यामध्ये क्लोज्ड क्रँककेस क्रँककेस आणि ट्रान्समिशनदरम्यान भिंतीसारखी देण्यात आली आहे, ज्यामुळे अंतर्गत फ्रिक्शनमधून होणारा उर्जेचा विनाश कमी होतो.

एयर कूलिंग यंत्रणा कार्यक्षमता उंचावण्यासाठी घनदाट हवेचा पुरवठा कायम राखते आणि इंजिनचे तापमान आदर्श श्रेणीत ठेवत सर्व आरपीएम श्रेणीत अनुकूल कंबशन राहील याची खात्री करते. पिस्टन कुलिंग जेट इंजिनची थर्मल कार्यक्षमता सुधारते आणि पर्यायाने इंधन कार्यक्षमताही उंचावते.

होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी) पुढच्या आणि मागच्या चाकाच्या वेगातील फरक जाणून घेत रियर व्हील ट्रॅक्शन कायम राखण्यात मदत केली जाते तसेच स्लिप रेशियो मोजला जातो आणि फ्युएल इंजेक्शनद्वारे इंजिन टॉर्कचे नियंत्रण केले जाते. मीटरच्या डाव्या बाजूला असलेला स्विच वापरून एचएसटीसी चालू/बंद करता येऊ शकते. सिस्टीम कार्यरत असताना डिजिटल डिस्प्लेवरील ‘T’ फ्लिकर होतो.

होंडा स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीममुळे (एचएसव्हीसीएस) रायडर्सना रायडिंगचा आनंद घेत असतानाच जगाबरोबरही कनेक्ट राहाता येते. राइडसह असलेला कनेक्ट आणखी बळकट करण्यासाठी H’ness CB350 & NEWCB350RS मध्ये (DLX Pro व्हेरिएंट) जगातील पहिली, कंपनीअंतर्गत विकसित करण्यात आलेली होंडा स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीम (एचएसव्हीसीएस) बसवण्यात आली आहे. रायडर्सना आता ब्लुटुथद्वारे एचएसव्हीसीएस अप्लिकेशनमधून आपला स्मार्टफोन मोटरसायकलशी कनेक्ट करता येईल. कनेक्ट झाल्यानंतर रायडरच्या हँडलबारच्या डाव्या बाजूस असलेल्या कंट्रोल्सच्या मदतीने सिस्टीम म्हणजेच फोन कॉल्स, नॅव्हिगेशन, म्युझिक प्लेबॅक आणि इनकमिंग मेसेजेस अशा सुविधा वापरता येतील. रायडिंगवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी अक्सेस करण्यात येत असलेली माहिती हेल्मेट हेडसेट स्पीकर्सद्वारे दिली जाईल.*

असिस्ट आणि स्लिपर क्लचमुळे क्लच लिव्हर ऑपरेशन लोड कमी करताना गियर शिफ्ट सफाईदार होते आणि कमी थकवा येतो तसेच सततचे शिफ्टिंग कराव्या लागणाऱ्या राइड्समध्ये जास्त आराम मिळतो.

आधुनिक डिजिटल- अनॉल़ग मीटरमध्ये टॉर्क कंट्रोल, एबीएस, इंजिन इनहिबिटरसह साइड स्टँड इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर आणि बॅटरी व्होल्टेज अशाप्रकारचे तपशील देण्यात आले आहेत. त्याचबरोबर इंधन कार्यक्षमतेचे तपशील तीन मोड्समध्ये – रियल टाइम मायलेज, अव्हरेज मायलेज आणि डिस्टन्स टु एम्प्टी देऊन रायडिंगचा अनुभव आणखी समृद्ध करण्यात आला आहे.

२०२३ CB350s मध्ये नवा इमरजन्सी स्टॉप सिग्नल (ईएसएस) देण्यात आला आहे, जो अचानक ब्रेक लावावे लागल्यास मागे असलेल्या वाहनांना संदेश देतो. एबीएस मोड्युलेटरला अचानक ब्रेकिंग होत असल्याचे कळते तेव्हा वळण्याचा सिग्नल वेगाने फ्लॅश होतो आणि मागे असलेल्या वाहनांना पटकन संदेश मिळतो. फुल एलईडी सेटअपमुळे रायडर्सना अंधारातून वाट काढणे, घनदाट अंधारी रस्ताही प्रकाशमान करणे शक्य होतेच, शिवाय त्यांचा लूकही स्टायलिश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading