भिडे वाड्याचे संवर्धन दिलेल्या शब्दाप्रमाणेच पूर्ण होणार – योगेश टिळेकर
पुणे : आज राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला या अर्थसंकल्पात भिडे वाड्याच्या संवर्धनासाठी ५० कोटींची भरीव तरतूद करण्यात आली. याच्या प्रित्यर्थ आज पुण्यातील भिडे वाड्यासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश ओबीसी आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर,प्रमोद कोंढरे,माजी नगरसेविका गायत्री खडके यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या वेळी बोलताना टिळेकर म्हणाले की आघाडी सरकारच्या काळात भिडे वाड्या संदर्भात साधा प्रश्न ही सत्ताधारी पक्षाने उपस्थित केला नाही. परंतु शिंदे -फडणवीस सरकारने पहिल्याच अर्थसंकल्पात ५० कोटींची भरीव तरतूद केली त्यामुळे भिडे संवर्धन नक्की पूर्ण होणार.
या वेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले की, अनेक वर्षांपासून भिडे वाड्याचा प्रश्न प्रलंबित होता त्याला आता मूर्तस्वरूप प्राप्त झाले आहे