fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsSports

यूपी वॉरियर्सने मेलोरासोबत साजरा केला आंतरराष्ट्रीय महिला दिन

मुंबई : महिला प्रीमियर लीगमधील संघ यूपी वॉरियर्सने ८ मार्च २०२३ रोजी लोअर परेल येथील पॅलाडियम मॉलमधील मेलोरा ज्वेलरी स्टोअर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला.

इंग्लिश फिरकीपटू सोफी एक्सेलेस्टोन, इंग्लिश वेगवान गोलंदाज लॉरेन बेल, अष्टपैलू भारतीय फलंदाज शिवाली शिंदे आणि भारतीय गोलंदाज अंजली सरवानी या यूपी वॉरियर्स संघामधील चार स्टार खेळाडूंनी महिला म्हणून एकमेकांप्रती प्रशंसा व पाठिंबा दाखवत संघामधील सामर्थ्याचे प्रतीक म्हणून एकमेकांना बिजूटरी (जडजवाहिरे) देण्यासाठी मेलोरा ज्वेलरी स्टोअरला भेट दिली.

मेलोरा ज्वेलरीचे तत्त्व ‘डिझाइन्‍ड टू मॅच युअर लाइफस्टाइल’ त्यांची ज्वेलरी कशाप्रकारे वजनाने हलक्या व अद्वितीय डिझाइन्समधून प्रेरित असण्याच्या अवतीभावेती फिरते, जी जीवनाच्या सर्व स्तरांमधील महिला दररोज परिधान करू शकतात. या खेळाडूंनी एकमेकींसाठी मैदानावर व मैदानाबाहेर शोभून दिसणाऱ्या सर्वोत्तम ज्वेलरीची निवड केली, तसेच जगभरातील महिला कशाप्रकारे एकमेकांना अखंड समर्थन देणाऱ्या आधारस्तंभ आहेत आणि जागतिक स्तरावर महिलांच्या उन्नतीसाठी त्यांच्या सर्व प्रयत्नांकरिता त्यांचे कसे कौतुक केले पाहिजे यावर भर दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: