fbpx

श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजच्या वतीने महिला दिन साजरा

पुणे : श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महिला मंडळ पुणे तर्फे स्वारगेट येथे दशमुखी भवानी माता मंदिरात महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यामध्ये पाककला स्पर्धा, संगीत खुर्ची, लकी ड्रॉ व विविध नृत्य कार्यक्रम ठेवले गेले होते. छोट्या मुलांचे डान्स ठेवले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजातील महिला उपस्थित होत्या.
सुंदर व मोहक असे नृत्य, भरघोस बक्षिसे, भगिनींचा उदंड प्रतिसाद, विविध कलांना मिळालेली उत्स्फूर्त दाद, फेटे बांधून मिरवणाऱ्या महिला या सर्वांमुळे कार्यक्रमाला वेगळीच शोभा आली. महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शशिकला आरसीद यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. महिला मंडळाचे पुष्पा वखारे ,आशा चव्हाण, मेघा पवार, विद्या कुकर, विणा दलबंजन, अर्चना कोल्हापुरे मीना धोंगडी, सारिका वाळवेकर, शोभा चावंडे तसेच ट्रस्टी मनोज आरसिध्द व कार्यकारणी ,युवक संघटना, शिक्षण मंडळ ,वधुवर सुचक मंडळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.

Leave a Reply

%d bloggers like this: