fbpx

24 तासात विनाशुल्क 450 हेअर कट करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार नोंद

पुणे :पुण्यातील कर्वेनगर भागातील आनंद मेन्स पार्लरचे संचालक संतोष दत्तात्रय सुरवसे येत्या 19 मार्च रोजी सलग 24 तास तब्बल 450 ते 500 हेअर कट करणार आहे या बाबीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड ,लिम्का बुक, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या घेणार आहेत
19 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते हेअर कट करणार असून विशेष बाब म्हणजे सर्व हेअर कट निशुल्क करणार आहेत देशात नव्हे तर जगात हा एक प्रकारचा विक्रम होऊन पुण्याचं नाव नक्कीच यामुळे उंचावणार आहे
गेल्या 10 ते 15 वर्षे सलून व्यवसायात स्थिरावर असताना नक्कीच हा विक्रम साध्य करणार असल्याचा विश्वास यावेळी संतोष दत्तात्रय सुरवसे यांनी व्यक्त केला 19 मार्च रोजी यु ट्यूब वर याचे लाईव्ह प्रक्षेपण होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली

Leave a Reply

%d bloggers like this: