fbpx
Monday, September 25, 2023
BusinessLatest News

स्पिनीने पुण्यामध्ये ‘स्पिनी पार्क’ हे अद्वितीय व अनोखे असे अनुभव केंद्र सुरू केले

पुणे : ‘स्पिनी’, भारतातील वापरलेल्या कारच्या खरेदी विक्रीचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व कामे करता येतील असे एक संपूर्ण व्यासपीठ, यांनी आज पुण्यातील हिंजेवाडी गाव, मुक्काम पोस्ट वाकड येथे ‘स्पिनी पार्क’  (Spinny Park) हे एक अद्वितीय व अनोखे असे प्रयोगात्मक अनुभव केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. या पार्कची संकल्पना त्यांच्या स्वतः निवडलेल्या कार्सच्या संग्रहाद्वारे आणि त्यांच्या विस्तृत व अत्याधुनिक जागेच्या माध्यमातून शहरातील ग्राहकांचा कार खरेदीचा अनुभव अधिक समृद्ध करते.

हे नवीन स्पिनी पार्क एकूण तीन एकराच्या परिसरात पसरलेले आहे. येथे ५०० हून अधिक निवडक व स्पिनीकडून आश्वस्त अशा कार्स आणि स्पिनी मॅक्स पूर्व मालकीच्या लक्झरी कार्ससह मोठ्याप्रमाणात अनेक वेगवेगळ्या कार्स राहू शकतात आणि शिवाय कार्स पाहण्यासाठी, निवडण्यासाठी आणि त्यांची चाचणी घेण्यासाठीसुद्धा मोकळी जागा आहे. पुण्यातील स्पिनी सोलापूर, औरंगाबाद आणि रत्नागिरीसह जवळपासच्या शहरांमध्ये घरपोच सेवा आणि घरोघरी तपासणीची सुविधा पुरवते. पुण्यातील कामकाज फेब्रुवारी २०२० मध्ये सुरू झाल्यापासून स्पिनीने २५,००० हून अधिक कार्सच्या खरेदी विक्री व्यवहारांची सेवा दिली आहे, ज्याचा वाटा पुण्याच्या वापरलेल्या कार बाजारातील १०% पेक्षा जास्त आहे. स्पिनीने मागील वर्षी बंगळूर येथे आपले प्रमुख आणि भारतातील सर्वात मोठे अनुभव केंद्र सुरू केले होते.

या घोषणेबाबत बोलताना स्पिनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज सिंग म्हणाले, “पुणे ही आमच्यासाठी एक महत्त्वाची आणि भरभराटीची बाजारपेठ आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांचा शहरातील अनुभव उंचावण्यास उत्सुक आहोत. वापरलेल्या कार उद्योग क्षेत्रात एक साधा, सहज आणि आनंददायी खरेदी विक्रीचा अनुभव प्रदान करण्यात एक अग्रगण्य व्यासपीठ म्हणून आम्ही एखाद्या व्यक्तीसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी कारची आवश्यकता तिचे महत्व आणि तिचा अर्थ काय असतो हे जाणतो. देशात आमचे दुसरे स्पिनी पार्क चालू केल्याने ग्राहकांना अखंडित व उत्तम कार खरेदी विक्री अनुभव देण्याची आमची वचनबद्धता स्पष्ट होते. पुण्यातील स्पिनी पार्कमध्ये ५०० हून अधिक स्वतः निवडलेल्या कार्सचे विविध प्रकार आहेत. ग्राहकांना आराम मिळावा आणि त्यांच्या आवडत्या कारची चाचणी घेता यावी यासाठी हे आकाराने मोठे निसर्गरम्य परिसरात प्रायोगिक केंद्र उभे केले आहे.” स्पिनी देशभरात ५७ पेक्षा जास्त कार केंद्र चालवते, ज्याची एकूण पार्किंग क्षमता १२,००० पेक्षा जास्त कार्स एवढी आहे. स्पिनी पुण्यामध्ये ४ कार केंद्र चालवीत आहे, ज्याची एकूण पार्किंग क्षमता ८०० पेक्षा जास्त कार्स एवढी आहे. स्पिनी पार्क जोडल्यामुळे शहरातील एकूण क्षमता १३०० हून अधिक गाड्यांवर पोहोचेल. पीव्ही सिंधुने पुण्यातील स्पिनी पार्क मध्ये नमूद केले की, “मी जितकी अधिक स्पिनीशी जोडले गेले तितकेच अधिक मी हे अनुभवत गेले की स्पिनी विश्वास, पारदर्शकता आणि अनुभव या मूलभूत मूल्यांसह वितरण करते. टेनिस कोर्टमध्ये आणि त्या बाहेरही असताना माझ्यातील जे धैर्य आणि लवचिकता आहे त्याला स्पिनी प्रतिबिंबित करते आणि दाखवते की गोष्टी कठोर आणि योग्य मार्गाने करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. जसे आपण म्हणतो, त्या अतिरिक्त मैलासाठी दूरपर्यंत जा, त्या अतिरिक्त दिवसासाठी काम करा, नेहमीच्या सीमांच्या पलीकडे जा, गोष्टी घडवून आणा आणि मग गोष्टी घडतील.” स्पिनी व्यासपीठावरील प्रत्येक स्पिनी आश्वस्त कार २०० पॉइंट तपासणी चेकलिस्ट, समस्या आढल्यास एक ही प्रश्न न विचारता पाच दिवसांच्या आत पैसे परत मिळण्याची गॅरंटी, विक्रीनंतर एक वर्षांच्या वॉरंटीसह येते; जी संपूर्ण पारदर्शकता, गुणवत्ता, सुविधा आणि विश्वास प्रदान करण्याची ब्रॅंडची वचनबद्धताच प्रतिध्वनीत करते. गेल्या काही वर्षात, स्पिनीची एकूण ग्राहक संख्या दोन लाखांहून अधिक झाली आहे आणि जवळपास ५४% कार खरेदी स्पिनीच्या ऑनलाइन व्यासपीठावरून ऑनलाइन केल्या जातात.

Leave a Reply

%d bloggers like this: