सरहद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (Women’s Day )सरहद महाविद्यालयातील (Sarhad College) प्राध्यापक, कर्मचारी यांच्या माता व सासूबाईस सर्वोत्कृष्ट आई व सर्वोत्कृष्ट सासूबाई या पुरस्काराने सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आईने आपल्या पाल्यास दिलेले जीवन, निरपेक्ष प्रेम, मायेची ऊब, जगण्याचे बळ, संस्कारांची शिदोरी, अतूट विश्वास, यामुळे आयुष्यातील प्रत्येक अडचणींवर मात करण्याची जिद्द निर्माण होऊन आयुष्याची वाटचाल यशस्वीरीत्या करता येते. त्याबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून सर्वोत्कृष्ट आई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सासूबाईंनी आपल्या सुनेस दिलेला दृढ पाठिंबा, सन्मान, अधिकार , विश्वास, प्रेम, आपुलकीमुळे विवाहोत्तर वाटचाल सुखद होऊन कौटुंबिक व कार्यक्षेत्रातील प्रत्येक आघाडीवरील आव्हानांना सामोरे जाऊन सुखकर जीवनप्रवास साध्य करता येतो, त्याबद्दल कृतार्थ व कृतज्ञतेच्या भावनेतून सर्वोत्कृष्ट सासूबाई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी सरहद संस्थेच्या सचिव सुषमा नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, शोभना वाडेकर, अंजली नहार, शामा मुंढे – जाधवर, प्राचार्य डॉ. हनुमंत जाधवर, अनुज नहार, उपप्राचार्य डॉ. संगिता शिंदे, सन्मानार्थी, सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. पदपूजन, स्वागत, पुरस्कार वितरण, कविता वाचन, नृत्य, विविध खेळ व भोजन असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक मंडळाने केले होते.