Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

रास करंडक : ग्रुप सूर्या संघाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले !!

पुणे : रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस प्रा.लि. तर्फे आयोजित ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत ग्रुप सुर्या संघाने मिलेनियम इंजिनिअर्स अँड काँट्रॅक्टस् संघाचा ६८ धावांनी पराभव करून सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद संपादन केले.

स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पुनावळे येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राजेश पवार याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ग्रुप सुर्या संघाने मिलेनियम इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स संघाचा पराभव केला. गतवर्षी विजेतेपद मिळवणार्‍या ग्रुप सुर्या संघाने या वर्षीही विजेतेपद राखले. पहिल्यांदा फलंदाजी करताना ग्रुप सुर्या संघाने १२ षटकात १५८ धावांचे आव्हान उभे केले. आकाश नवले याने ६६ धावांची तर, राजेश पवार याने ५६ धावांची खेळी करून संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना मिलेनियम इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स संघाचा डाव ९० धावांवर मर्यादित राहीला. हर्ष कपाडीया (१९ धावा) आणि प्रभात देवदी (१६ धावा) यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही. राजेश पवार याने ३५ धावात ३ गडी टिपले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण नगरसेवक श्री. सचिन दोडके, केंद्रीय सेवाकर विभागाचे माजी सहआयुक्त एस.के. पाटील आणि रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस्चे व्यवस्थापकीय संचालक अनिल हिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस्चे व्यवस्थापकीय संचालक अनिल हिंगे यांनी सर्वांचे आभार मानले.

स्पर्धेतील विजेत्या ग्रुप सुर्या संघाला १ लाख रूपये पारितोषिक आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला मिलेनियम इंजिनिअर्स ५१ हजार रूपये पारितोषिक आणि करंडक देण्यात आले. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू राजेश पवार (सुर्या ग्रुप, १६८ धावा, ७ विकेट), सर्वोत्कृष्ट फलंदाज तन्मय कांजिलाल (मिलेनियम, २२७ धावा), सर्वोत्कृष्ट गोलंदाज शुभम महाले (सुर्या ग्रुप, ९ विकेट) अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
सुर्या ग्रुपः १२ षटकात ५ गडी बाद १५८ धावा (आकाश नवले ६६ (३२, ४ चौकार, ६ षटकार), राजेश पवार ५६ (२६, ६ चौकार, ३ षटकार), शुभम महाले २१, सुरज राजू २-१२, हर्ष कपाडीया २-२४) वि.वि. मिलेनियम इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्सः १२ षटकात ९ गडी बाद ९० धावा (हर्ष कपाडीया १९, प्रभात देवदी १६, राजेश पवार ३-३५, संकेत अरू २-१३); सामनावीरः राजेश पवार;

प्ले ऑफ फेरीः क्वालिफायरः
मिलेनियम इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्सः १० षटकात ६ गडी बाद ८४ धावा (तन्मय कांजिलाल ६२ (३८, ७ चौकार, ३ षटकार), प्रशांत भोईर १-१३) पराभूत वि. सुर्या ग्रुपः ७ षटकात बिनबाद ८७ धावा (शुभम महाले नाबाद ३१, राजेश पवार नाबाद ५३ (२७, ५ चौकार, ४ षटकार); सामनावीरः राजेश पवार;

एलिमिनेटर १: आरकॉन पुणेः १० षटकात ७ गडी बाद ८३ धावा (मयुर गोखले ४५, ओंकार कोठाळकर १६, रजनिकांत पडवळ ४-११) पराभूत वि. सुरोज बिल्डकॉनः ६.२ षटकात ३ गडी बाद ८४ धावा (योगेश लंके ४४, रजनिकांत पडवळ १८, ओंकार कोठाळकर २-१३); सामनावीरः रजनिकांत पडवळ;

एलिमिनेटर २: सुरोज बिल्डकॉनः १० षटकात ५ गडी बाद ११२ धावा (प्रिआंश तिवारी ४०, तारा बापू नाबाद २८, विनोद विश्‍वकर्मा ३-२२) पराभूत वि. मिलेनियम इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्सः ९.४ षटकात २ गडी बाद ११३ धावा (तन्मय कांजिलाल नाबाद ७९ (३८, १२ चौकार, १ षटकार), निखील यादव नाबाद २२, योगेश लंके २-२१); सामनावीरः तन्मय कांजिलाल;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading