Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भारती यांची बदली

पुणे –  महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांची बदली झाली आहे. डॉ. भारती हे राज्य शासनाच्या आरोग्य सेवेतील अधिकारी असून २०२१ मध्ये कोरोना काळात त्यांची महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतू २०२२ मध्ये त्यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली होती. हा कालावधी संपुष्टात आल्याने डॉ.भारती यांची बदली आरोग्य उपसंचालक कार्यालयात करण्यात आली असून पुढील नियुक्ती होईपर्यंत आरोग्य प्रमुख पदाचा पदभार समकक्ष अधिकार्‍याकडे देण्याचे आदेश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने महापालिकेला दिले आहेत.shr

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading