fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

कसबा विधानसभा मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट

पुणे : कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळ गोदाम येथे कसबापेठ विधानसभा मतदार संघ मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे – देवकाते, परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, उपजिल्हाधिकारी संजय तेली, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ- बारटक्के आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. देशमुख यांनी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या सुविधांचा आढावा घेतला. मतमोजणीसाठी करण्यात आलेली टेबलची व्यवस्था, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी यांची व्यवस्था, तेथील सुरक्षा व्यवस्था, मतमोजणीच्या ठिकाणी नेमलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्यासाठीची व्यवस्था आदीसंबंधाने माहिती घेऊन त्यांनी सूचना केल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading