Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

श्री. सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज युवक संघटनेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

पुणे : श्री. सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज युवक संघटनेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  अशोक बारड व सुनील वाळवेकर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. श्री. सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्ट पुणे. अध्यक्ष मनोज आरसिद्ध व सचिव  अनिल दामजी,  प्रदीप काटवे, अशोक कटारे. उमेश आरसिद्ध,  नितीन धोंगडी,  संतोष बाकळे तसेच वधू वर सूचक मंडळा चे  गोपाळ चव्हाण,  राजेद्र पवार व  श्रीकांत मिस्कीन  बंडू बाकळे , नारायण दगडू कार्यक्रमांस उपस्थितीत होते.

पूना ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरचे सलग तिसरे वर्ष होते. शिबिरात ४१ जणांनी रक्तदान केले. रक्तदान सोबत आरोग्य शिबिर, विविध दाखले शिबिर याचे उपक्रम राबविण्यात आले .

हर्बल लाईफ कडून केलेल्या आरोग्य शिबिरला १००पेक्षा जास्त जणांनी आरोग्य तपासणी शिबिरा चा लाभ घेतला. हर्बल लाईफ कडून आमंत्रित प्रतिनिधी सौ. मंजुळा गांगजी ताईने व त्यांच्या सहकार्य नी शिबिरा चे मार्गदर्शन केले.

सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महिला मंडळ पुणे कडून   शशिकलाताई आरसिद्ध, . मेघाताई पवार  अर्चनाताई कोल्हापुरे,  सारिकाताई वाळवेकर व  मीनाताई धोंगडी यांनी आपल्या समाज बांधवासाठी अल्प दरात जातीचे प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र देण्याची सोय उपलब्ध करून दिली.

श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज युवक संघटना पुणे. अध्यक्ष  संदीप वडनेरे व सनी रंगापुरे,  प्रशांत पवार,  महेश दामजी,  संजय वडनेरे,  रोहन दामजी,   निखिल आरसिद्ध,  तेजस आरसिद्ध,  शंतनु कोसंदर,  विशाल पवार,  चेतन शालगर, गणेश चव्हाण,  बिपिन पवार,   आनंद त्रिमल आदी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमास हातबल लावला .

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading