.. तो साथ निभाना पडेगा – उद्धव ठाकरे
मुंबई : मी भाजपला सोडलं आहे, हिंदुत्वाला सोडलेल नाही. भाजप सोबतची युती देखील मी नाही तर भाजप ने तोंडली. आणि मला कॉँग्रेसकडे जाण्यासाठी भाग पाडलं, असा आरोप करीत “आगर आप साथ आना चाहते है, तो साथ निभाना पडेगा, आपण आता एकत्रित पुढे जाऊ”, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीयांना साद घातली
आज उद्धव ठाकर यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच शिवजयंतीच्या मुहूर्तावरवर भविष्यात सोबत रहाल तर सर्व काही देऊ, अश्या शब्दात युतीची ऑफर देखील दीली.
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून मत मागितल्याचा आरोप केला जातो. पण आता मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याच फोटोचा वापरावा लागतो. तेव्हा त्यांचे राजकारण कुठे जाते? मी भाजपला सोडलं आहे, हिंदुत्वाला सोडले नाही. हिंदूंच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम भाजपने केले आहे. काँग्रेसच्या काळात इस्लाम खतरे में था तर आता भाजपच्या काळात मात्र हिंदू धोक्यात आला आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आयोगाच्या निर्णयामुळे जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांना खोट्या धनुष्यबाणासह निवडणुकीला सामोर जाऊ दे. ते आपला धनुष्यबाण घेवू शकतात आपल्या मनातला राम घेवू शकत नाही.
