fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिवसेना नाव आणि चिन्हासाठी २ हजार कोटींचा सौदा – संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्यासाठी आतापर्यंत २ हजार कोटींचा सौदा झाल्याचा खळबळजनक आरोप आज खासदार संजय राऊत यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील असेही त्यांनी म्हटंले आहे. राऊत यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच खळबळ उडाली आहे.  

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. या निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय नेत्यांबरोबरच कायदेतज्ज्ञ अन् जनताही टीका करत आहे. त्यात आता खासदार संजय राऊत यांनी पक्षांच्या नावाच्या आणि चिन्हाच्या बदल्यात 2 हजार खोकी घेतल्याचा आरोप केल्याने राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटंले आहे की, ‘माझी खात्रीची माहिती आहे आहे… चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत… हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे… बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील… देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते…’. 

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळवण्यासाठी आतापर्यंत दोन हजार कोटींचे डील झाले आहे. काही बिल्डरांनी मला ही माहिती दिली आहे.  किती मोठे डील झाले आहे हे जर समजून घ्यायचे असेल तर १०० ऑडिटर्स लावावे लागतील. भारतीय जनता पक्षाला वाटले तर उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील. यापुढे अनेक गोष्टी विकत घेण्यासाठी प्रयत्न होतील, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading