कल्याण ज्वेलर्सने ‘लीला’ ज्वेलरी संग्रहाचे केले अनावरण
पुणे : भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीच्या ज्वेलरी ब्रॅंड पैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आपल्या ‘लीला’ या सर्वात नवीन संग्रहाला बाजारात आणण्याची घोषणा केली. ही दागिन्यांची श्रेणी वजनाने हलके दागिने प्रदर्शित करते, जे आजच्या तरुण भारतीय महिलांचे सार दर्शवते. या संग्रहामध्ये रंगीत रत्नांनी जडलेले मोहक गोल्ड रोझ आणि हिरे आहेत.
लीला’ आपल्या समकालीन डिझाईन्सच्या विविध पर्यायांसह आजच्या स्त्रियांना दर्शवते, कारण आजच्या काळातील स्त्री आत्मविश्वासाने, स्टाइलने, रुबाबाने आणि डौलाने आपले आयुष्य पुढे नेते.
ज्वेलरी ब्रॅंड ‘लीला’ च्या दूरचित्रवाणीवरील जाहिरातीमध्ये (TVC) मध्ये अमिताभ बच्चन आणि कल्याणी प्रियदर्शन हे ब्रॅंड अॅम्बेस्डर आहेत, जे यामध्ये हलक्या फुलक्या व गंमतीदार पद्धतीने कल्याण ज्वेलर्सने सादर केलेल्या उत्कृष्ट श्रेणीच्या डिझाईन्सना एक्सप्लोर करतात. केवळ दुरचित्रवाहिनीच नव्हे तर सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा अवलंब करून कल्याण ज्वेलर्सने जागतिक ब्रॅंड अॅम्बेस्डर कतरिना कैफ यांना घेऊन प्रिंट मिडिया मध्ये देखील प्रसार व जाहिरात सुरू केली आहे.
‘लीला’ श्रेणी बाजारात आणून कल्याण ज्वेलर्सने वजनाने हलक्या असणाऱ्या दागिन्यांसह आपल्या उत्पादनाचा पोर्टफोलिओ मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जोमाने जाहिरात आणि प्रसार पद्धतीचा अवलंब करून ज्वेलरी ब्रॅंड वेगवेगळ्या ग्राहक वर्गांना आपलेसे करण्यासाठी सातत्याने आपल्या ऑफर्समध्ये विविधता आणत आहे. आपल्या नव्याने बाजारात आलेल्या लीला या दागिन्यांच्या संग्रहाबद्दल कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श रमेश कल्याणरमण म्हणाले, “कल्याण ज्वेलर्समध्ये आम्ही हे जाणतो की, दागिने हे केवळ शोभेसाठी नसून हे दागिने परिधान करणाऱ्या महिलेचा आणि तिच्या स्त्रित्वाचा तो एक उत्सव आहे. हे पूर्णपणे नवीन असे लीला संग्रहाने आपल्यासोबत अनन्यसाधारण, खास संकलित व तयार केलेले, रत्नजडित, वजनाने हलके आणि कालातीत आकर्षण ठरणारे डिझाईन्स आणले आहेत. आम्हाला विश्वास आहे की, हा संग्रह आमच्या विद्यमान ब्रॅंड पोर्टफोलिओला पूरक ठरेल आणि तरुण ग्राहकांमध्ये व्यापक लोकप्रियता मिळवेल. लक्षवेधी आणि कार्यक्षम अशा दोन्ही प्रकारच्या या अनोख्या संग्रहासह विविध ग्राहक विभागांमध्ये आमची उपस्थिती अधिक वाढवणे आणि आमचा बाजारातील हिस्सा लक्षणीयरीत्या मजबूत करणे हे आमचे ध्येय आहे.”
रोझ गोल्ड रंगछटांसह हिऱ्यांची चमक आणि रंगीत रत्नांची चैतन्यपूर्णता या संग्रहात रुबाब आणि अनोखेपणा आणतात. हे विविध प्रकारच्या आकर्षक दागिन्यांचे पर्याय देतात जे पाश्चात्य आणि पारंपरिक दोन्ही पोषाखांवर शोभून दिसू शकतात. हिऱ्यांच्या लालित्यांसह जोडलेले हे आकर्षक उठून दिसणारे रंग सौंदर्याचा एक अनोखा मिलाफ तयार करतात.
या ब्रॅंड ला अनोख्या शैलीत बाजारात आणताना कल्याण ज्वेलर्सने सर्व वस्तूंच्या घडणावळीवर २५% पर्यंत सूट तसेच बाजारातील सर्वात कमी असा सोन्याचा दर असलेले कल्याण स्पेशल बोर्ड रेट जाहीर केले आहे. ग्राहक दागिन्यांच्या खरेदीवर कल्याणच्या चार स्तरीय हमी प्रमाणपत्रासह (४-लेवल अॅश्यूरन्स सर्टिफिकेशन) अखंड सेवा समर्थित खरेदी अनुभव घेत या रोमांचक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. ही खास ऑफर १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत लागू आहे. सोन्याच्या दागिन्यांवर कल्याणच्या चार स्तरीय हमी प्रमाणपत्राचे (४-लेवल अॅश्यूरन्स सर्टिफिकेशन) फायदे ही ग्राहक घेऊ शकतात.कल्याण ज्वेलर्समध्ये रिटेल विक्री केलेले दागिने अनेक शुद्धता चाचण्यांमधून जातात आणि ते बीआयएस हॉलमार्क केलेले असतात. चार स्तरीय हमी प्रमाणपत्र ग्राहकांना देवाणघेवाण किंवा पुनर्विक्री करताना पावतीमध्ये नमूद केलेल्या शुद्धतेच्या मूल्यावर किंमत देण्याचे वचन देते. तसेच, ते देशातील कोणत्याही कल्याण ज्वेलर्सच्या शोरूममध्ये दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल सुनिश्चित करते.
