आप पालक युनियन तर्फे RTE प्रवेश घेणाऱ्या पालकांसाठींचा मेळावा
पुणे: विदयार्थी सहायक समिती सभागृह, शिवाजीनगर येथे आप पालक युनियन तर्फे आर टी ई पालक मेळावा घेण्यात आला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पालक युनियन सदस्य म्हणून नोंदणी करून घेण्यात आली.
आप चे मुकुंद किर्दत यांनी शिक्षण हक्क,पालक युनियन ची आजवरची लढाई, प्रवेश प्रक्रिया याची माहिती दिली. पुण्यातील अनेक खाजगी शाळांमध्ये वंचित घटकातील मुलांना भेदभावाची वागणूक दिली जाते. तो भेदभाव पूर्णपणे थांबण्याची गरज आहे. तसेच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत विद्यार्थ्याला शिक्षण हे हक्क म्हणून मोफत मिळावे यासाठी तातडीने कायदे,नियम करून अंमलबजावणी सुरू करावी अशी मागणी यावेळेस मुकुंद किर्दत यांनी केली.
तसेच गणित विषय मुलांना कसा शिकवावा यावर नवनिर्माण संस्थेच्या संचालक गीता महाशब्दे व प्रिया बारभाई यांनी मार्गदर्शन केले.
आर टी ई प्रवेश प्रक्रिया आणि युनियनची आवश्यकता, आप चे दिल्लीतील शैक्षणिक क्षेत्रातील काम याविषयी पालकांना माहिती देण्यात आली.
आप पालक युनियन चे विजय रणदिवे यांनी सुत्र संचालन केले, ललिता गायकवाड यांनी युनियन चे महत्व सांगितले. या वेळी मंचावर शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष सतिश यादव उपास्थित होते. आप संघटन सचिव अक्षय शिंदे यांनी आभार मानले.
पालकांसोबत आप चे नीलेश वांजळे, सुरेखा भोसले, तुषार कासार, शंकर थोरात, काजल दातखिळे, वैशाली डोंगरे, श्रीकांत चांदणे, दिनेश वर्मा आदी उपस्थित होते.
