Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

कसबा पोटनिवडणुक साठी इच्छुक असलेले अविनाश मोहिते यांचा संभाजी ब्रिगेड ने केला सन्मान


पुणे:पिंपरी पेंढार व पिंपळवंडी ता. जुन्नर जिल्हा पुणे येथे संभाजी ब्रिगेड शाखेची स्थापना पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आली, प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थांना संभाजी ब्रिगेडने केले यशस्वी आंदोलने व येथून पुढची रणनीती यावर मार्गदर्शन केले,
पिंपरी पेंढार ग्रामस्थांच्या वतीने पुणे महानगरध्यक्ष व कसबा विधानसभा पोटनिवडणुक साठी इच्छुक असलेले अविनाश मोहिते यांचा सन्मान करण्यात आला,
राजाराम गाजरे यांची जुन्नर तालुका कार्याध्यक्ष, राजेंद्र गाजरे यांची जुन्नर ता. उपाध्यक्ष, बाळासो गाजरे यांची जुन्नर संघटक, मनीष कुटे यांची पिंपरी पेंढार शाखाध्यक्षपदी निवड करण्यात आली, पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र दिले,
पुणे महानगरध्यक्ष मोहिते यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या,
जुन्नर तालुका कार्याध्यक्ष राजाराम गाजरे यांनी मनोगत वेक्त करताना शेतकरी व गावातील जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आवाज उठवून जनतेला न्याय देण्याचं काम करणार आहे, अशी ग्वाही दिली,
आगामी काळात जिल्हापरिषद, पंचायतसमिती निवडणूक आहे आपल्याला संभाजी ब्रिगेडची मोठी ताकत उभी करून निवडणुकीला सामोरे जायचं आहे, त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागायचं आहे,असे मत संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी वेक्त केले,
यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा सचिव निलेश ढगे, महानगर सचिव संदीप कारेकर, संभाजी ब्रिगेड चे शिरूर लोकसभा २०१९ निवडणूकीचे उमेदवार तथा हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, मराठा सेवासंघ जुन्नर तालुकाध्यक्ष रुपेश जगताप, संभाजी ब्रिगेड जुन्नर तालुकाध्यक्ष आकाश हुलवळे, जुन्नर तालुका प्रवक्ते प्रवीण सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, दीपक गाजरे,नितेश काकडे,प्रणव डेरे मुकुंद कुटे,बाळासो शिंदे, आदिनाथ काकडे, तुषार गाजरे,विशाल तपासे,संदीप कुटे, यांच्या सह पिंपरी पेंढार व पिंपळवंडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading