नवचैतन्य हास्य योग परिवारच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा
पुणे : नवचैतन्य हास्य योग परिवार उदय बाग ससाने गार्डन शाखा येथे”विविधतेमध्ये एकता, अखंड भारत रंग रंगीला भारत या, भारताच्या अखंडतेचे प्रतिक म्हणून भारतातील नऊ राज्यांमधील पारंपरिक वेशभूषेत महिलांनी नृत्य सादर करून भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला.
याप्रसंगी वानवडी पोलीस स्टेशनचे क्राईम पोलीस इन्स्पेक्टर संदीप शिवले साहेब तसेच सामाजिक कार्यकर्त्या कोमलताई शेंडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले, महिलांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली, शिवले साहेबांनी देशभक्तीपर गीत गायन करून रसिकांची दाद मिळवली, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विभाग प्रमुख प्रकाश अरगडे यांनी संपूर्ण आयोजन ची जबाबदारी उत्तमरीत्या पेलली, याप्रसंगी शीलाताई मोरे, माधवी अरगडे, नीलम तुपेकर, जयश्री शेरीगार, आशा हस्तोडिया, संगीता कवडे, सुशिलाताई कामटे, माणिक पैलवान, कांचन गायकवाड, सुशीला ताई आरगडे, जया बोबडे, वनिता सकरानी, वैशाली कवडे, या महिलांनी भाग घेतला तसेच प्रणव अरगडे आणि,प्रसन्न आरगडे यांनी संपूर्ण व्यवस्था उत्तमरीत्या सांभाळून कार्यक्रम आखीव रेखीव करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण माहिती. आपल्या दैनंदिन मध्य प्रसिद
