Thursday, August 27, 2026
BusinessLatest News

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून विस्तार योजनेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण

पुणे : देशातील सर्वात मोठ्या सोने आणि हिरेजडित आभूषणांच्या किरकोळ विक्री साखळींपैकी एक मलाबार गोल्ड अँड डायमंड्सनेअमेरिकेतील डलासटेक्सास येथे त्यांचे ३०० वे जागतिक शोरूम सुरू केले आहे. प्रेस्टन रोड येथे असलेले हे कंपनीचे अमेरिकेतील तिसरे शोरूम आहे. या शोरूमच्या अनावरणातून मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला १० देशांमध्ये ३०० शोरूमच्या मजबूत विक्री जाळ्यासह जागतिक स्तरावरील सहाव्या क्रमांकाचे आभूषण विक्रेते म्हणून स्थान कमावता आले आहे.

कॉलिन काउंटीच्या कमिशनर सुजॅन फ्लेचर,  आणि फ्रिस्कोटेक्सासचे महापौरजेफ चेनी यांनी संयुक्तपणे मलाबारच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक शामलाल अहमद यांच्या उपस्थितीत या शोरूमचे उद्घाटन केले. उद्घाटन कार्यक्रमाला मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एमपी अहमदमलाबार ग्रुपचे उपाध्यक्ष केपी अब्दुल सलामभारतातील व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक ओ आशरसमूह कार्यकारी संचालक – निर्मिती आणि बी२बी व्यवसाय विभागाचे प्रमुख ए.के. निषादइतर व्यवस्थापनातील सहयोगीहितचिंतक आणि मान्यवर यांची उपस्थिती होती.

शोरूमच्या अनावरणाबाबत बोलतानामलाबार ग्रुपचे अध्यक्षएमपी अहमद म्हणालेआम्ही डलासमधील या नवीन शोरूमसहएकूण विस्तारात ३०० व्या क्रमांकाला गाठले हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. आम्ही आमचा प्रवास कोझिकोडकेरळ येथे एका छोट्या शोरूमपासून सुरू केला आणि ३० वर्षांपेक्षा कमी कालावधीतआम्ही १० देशांमध्ये ३०० शोरूमसह मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. आम्ही आमचे ग्राहकभागधारककर्मचारी आणि इतर सहभागींचे त्यांच्याकडून मिळालेल्या निरंतर पाठबळासाठी आभारी आहोत. 

जागतिक स्तरावर अतुलनीय दर्जा आणि सेवा हमीच्या १० मलाबार हमीं सोबतविविधांगी सुविधांसह अतुलनीय दागिने खरेदीचा अनुभव आणि ग्राहक-अनुकूल धोरणांसाठी मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ओळखली जाते. या मलाबार हमींमध्ये आजीवन मोफत देखभालमोफत विमाहमीपत्र खरेदीआयजीआय आणि जीआयए-प्रमाणित हिरेजागतिक मानकांची २८-सूत्री गुणवत्ता तपासणीशून्य घटीसह सोने विनिमयसंपूर्ण पारदर्शकता९१६ हॉलमार्क प्रमाणित शुद्ध सोनेजबाबदार सोर्सिंगवाजवी किंमत धोरण आणि न्याय्य श्रम पद्धती यांचा समावेश आहे.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading