Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीतर्फे आदर्श महिलांना पुरस्कार

पुणे : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.  जिजाऊ जयंती निमित्त लाल महाल येथे आदर्श महिला पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी बालशाहिरांनी पोवाडे व एकपात्री प्रयोग सादर केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाळासाहेब दाभेकर, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, योगेश समेळ, संजय बहिरट, सुशील पवार, महिला अध्यक्ष संगीता भालेराव उपस्थित होते. यावेळी ऍड. कमल सावंत, प्रा. सुधा पाटील, राजश्री मंजिरे, भारती सोनवणे, लक्ष्मी शिवाजी डिंबले व इतर महिलांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. संध्या देशपांडे व राहुल तांबे यांनी केले. मुकेश यादव यांनी आभार प्रदर्शन केले. प्रशांत धुमाळ व मुकेश यादव, संदीप पाटील, युवराज देसले, गणेश यादव, बाळासाहेब अमराले, तानाजी शिरोळे, नारायण घुटे, मनीष काळे व विक्रमसिंह तौर, श्रुतिका पाडळे, भाग्यश्री बोरकर, अमोल मांढरे, योगेश खोपडे, आकाश भालेराव उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading