Saturday, June 13, 2026
BusinessLatest News

गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी व उपचारासाठी थर्मोग्लाइड लाँच

मुंबई मोबाइलओडीटी या एआय-समर्थित सर्विकल स्क्रिनिंगवर लक्ष केंद्रित करणाऱ्या इस्रायली फेमटेक स्‍टार्टअपने भारतातील अग्रगण्‍य डिजिटल मेडिकल व हेल्‍थकेअर सोल्‍यूशन प्रदाता जेनवर्क्‍ससोबत सहयोगाने त्‍यांचे नवीन डिवाईस थर्मोग्‍लाइड लाँच केले आहे. हे वजनाने हलकेपोर्टेबलएफडीए-मान्‍यताकृत डिवाईस आहेजे एकाच वेळी गर्भाशयाच्‍या ग्रीवेचा कर्करोग असलेल्‍या महिलांची तपासणी व उपचार करते.

महिलांमध्‍येविशषत: मूल होण्‍याच्‍या वयात गर्भाशयाला संसर्ग होणे सामान्‍य आहे. पण काहीच महिला पुढाकार घेऊन स्‍वत:ची तपासणी करतात. खरेतरवैद्यकीय संशोधनांमधून निदर्शनास आले आहे की अनेक महिलांना समकालीन उपचार प्रक्रिया वेदनादायीलांबलचक व कंटाळवाणी वाटते. उदाहरणार्थसर्व्हायकल एक्टोपियन हा एक सामान्य आजार आहे. यामुळे भरपूर स्त्राव होऊ शकतो आणि परिणामीबऱ्याच महिलांना चिंता आणि त्रास होऊ शकतो. बीएमसी मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासासह अनेक अभ्यास हे सिद्ध करतात.

बॅटरीवर चालणारा डिवाईस थर्मोग्लाइड थर्मो-कॉग्युलेशन तंत्र वापरते, जे उष्णतेचा वापर करून ती नष्ट करते. हे क्रायोथेरपीपेक्षा वेगळे आहेक्रायोथेरपी आणखी एक लोकप्रिय दृष्टीकोन आहेज्‍यामध्‍ये ती काढून टाकण्यासाठी थंड तापमानाचा वापर करतात. जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अॅण्‍ड ग्‍यानॅकॉलॉजी रिसर्चच्या मतेथर्मो-कॉग्युलेशन क्रायोथेरपीइतकेच प्रभावी व सुरक्षित आहे आणि उच्च-दर्जाच्या ग्रीवाच्या जखमांवर उपचार करण्यासाठी सहजपणे वापरता येऊ शकते.

साईनिवास हेल्‍थ केअरच्‍या मेडिकल डायरेक्‍टर आणि जेनवर्क्‍सच्‍या विमेन्‍स हेल्‍थच्‍या क्लिनिकल अडवायजर डॉ. प्रिया गणेश कुमारम्‍हणाल्‍या, एक्टोपियनच्या बाबतीत थर्मोग्लाइडचे चांगले परिणाम लोकांना मिळत आहेत. क्रायोथेरपीनंतर रुग्णांना कमीतकमी तीन आठवडे पाण्यासारखा स्त्रावचा त्रास होतो आणि त्यांना ते नकोसे वाटते. मोठ्या जखमांमध्ये क्रायोथेरपी वापरणे देखील आव्हानात्मक आहे, कारण या तंत्रामध्‍ये मर्यादा आहेत. पण थर्मोग्लाइड एक प्रभावी साधन ठरू शकते.

डॉ. प्रिया गणेश म्‍हणाल्‍या, मोबाइलओडीटीच्‍या मतेहा डिवाईस जलदपणेजवळपास आठ सेकंदामध्‍ये हिटिंग करत प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी करू शकतो आणि १०० अंश सेल्सिअस तापमान कायम ठेवू शकतोज्‍यामुळे गर्भाशयाच्‍या ग्रीवेचा त्‍वरित उपचार होऊ शकतो. थर्मोग्‍लाइडसह मी अनेक ठिकाणी हिटेड प्रोब वापरू शकते आणि ते देखील कमी वेळेत.

मोबाइलओडीटीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी लिओन बोस्‍टन म्‍हणाले, थर्मोग्‍लाइड हे वैविध्‍यताव्‍यावहारिकता व सुलभ वापरामुळे प्रत्‍येक स्‍त्रीरोगतज्ञासाठी आवश्‍यक साधन आहे. हा डिवईस सोप्‍यावेदनाविरहितजलद प्रक्रियेसह कर्करोगपूर्व जखमा व गर्भाशयाच्‍या ग्रीवेचा उपचार करू शकतो. आम्‍हाला आमचे सहयोगी जेनवर्क्‍स यांच्‍या सहयोगाने भारतात थर्मोग्‍लाइड लाँच करण्‍याचा अभिमान वाटण्‍यासोबत आनंद होत आहे. भारत आमच्‍यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading