दोन मुलांसह आई -वाडिलांची विष पिऊन आत्महत्या
पुणे : आर्थिक संकटाला कंटाळून एकाच कुटूंबातील चौघांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील केशवनगर येथे ही घटना घडली. आत्महत्या केलेल्यांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. दिपक थोटे (59), इंदू दिपक थोटे (45) मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (24) मुलगी समीक्षा दिपक थोटे (17) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोटे कूटूंबिय २ महिन्यांपूर्वीच केशवनगर भागात एका घरात भाड्याने राहायला आले होते. काल रात्रीपासून थोटे यांच्या घराचा दारवाजा उघडत नसल्याने शेजारी रहात असलेल्या नागरिकांनी दरवाजा तोडला. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. तात्काळ या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यामुळे या कुटुंबाने आत्महत्या केली असावी असा अंदाज शेजाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.
